अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
निफाड येथे सिम्बॉल ऑफ नॉलेज फाऊंडेशन तर्फे विध्यार्थ्यांना ट्रॉफी, बक्षीस व सन्मानपत्रचे वाटप.
नाशिक संपादक निफाड: विनोद गायकवाड
एक गुरु जो जीवनाला योग्य मार्ग दाखवतो. त्यांच्यामुळेच मिळते जीवनाला खरी दिशा, ५ सप्टेंबर, रोजी शिक्षक दिनांच्या औचित्य साधून चांदोरी येथे सिम्बॉल ऑफ नॉलेज या बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संविधान जनजागृती स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
या परीक्षेमध्ये ८० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून वयानुसार दोन गट पाडण्यात आले प्रत्येक गटांमध्ये ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून
सिम्बॉल ऑफ नॉलेज फाउंडेशन ने दिनांक २० सप्टेंबर, काँग्रेस भवन निफाड येथे उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन आढागळे, व्याख्यान कर्ते प्रा. ज्ञानोबा ढगे सर,मंगेश भन्साली यांच्या हस्ते प्रत्येक गटातून पाच उत्तीर्ण विद्यार्थी निवडून त्यांना सन्मानपत्र व ट्रॉफी बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच उर्वरित विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरवण्यात आले. संस्था नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत असते, महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी सुद्धा शाळेमध्ये वया पुस्तक वाटप ,अन्नदान वाटप तसेच सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करत राहते
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राकेशभाऊ निकाळे, उपाध्यक्ष दादाराव काऊतकर, सचिव प्रेम वाघ, खजिनदार विनोद गायकवाड , सल्लागार एड. राहुल गायकवाड, सहसचिव प्रवीण कोळी सदस्य सुनील साळवे, दादाराव पंडित, राहुल उन्हवणे, विक्रम आढाव यांनी परिश्रम घेतले असून बक्षीस वितरणाच्या प्रसंगी सर्व विद्यार्थी पालक तसेच सामाजिक व राजकीय शैक्षणिक पत्रकार वकील क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
संस्थेच्या माध्यमातून संविधान जनजागृती स्पर्धेचे आयोजन व सन्मानपत्र बक्षीस वितरण आजच्या दिवशी प्राध्यापक ज्ञानोबा ढगे सर यांचे संविधानावर व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला सूत्रसंचालन राहुल उन्हवने तसेच कार्यक्रमाचे आभार राकेशभाऊ निकाळे यांनी मानले.








