अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रभावी कोंबिंग ऑपरेशन बेलतरोडी पोलीस ठाण्याची कारवाई
आगामी नवरात्र उत्सव, दसरा व धम्मचक्र परिवर्तन दिन निमित्त विशेष मोहिम
पोलीस ठाणे बेलतरोडी, नागपूर शहर
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
दिनांक 20/09/2025 रोजी संध्याकाळी 06:00 ते रात्री 11:00 वाजेपर्यंत बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रभावी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
हे ऑपरेशन माननीय पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्र. 4 रश्मिता राव एन. व सहाय्यक पोलीस आयुक्त अजनी विभाग श्री. नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या नेतृत्वात पार पडले.
या कारवाईत झोन-4 मधील सातही पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले.
➡️ 11 अधिकारी
➡️ 45 पोलीस अंमलदार
कारवाईचा तपशील
कोंबिंग गस्तीदरम्यान खालीलप्रमाणे प्रभावी तपासणी व कारवाई करण्यात आली :
NDPS कायदा प्रमाणे : 03 कारवाई
दारूबंदी कायदा प्रमाणे : 01 कारवाई
BNSS कलम 129, 126 प्रमाणे 06 कारवाई
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे : 02 कारवाई
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110/117 प्रमाणे: 02 कारवाई
कलम 33 R/W प्रमाणे : 05 कारवाई
COTPA कायदा प्रमाणे: 10 कारवाई
🔹 फरार आरोपी तपासणी – 03 जण ताब्यात
🔹 सराईत गुन्हेगार तपासणी – 08 जण
🔹 शरीरविषयक गुन्हेगार तपासणी – 05 जण
ऑपरेशनची उद्दिष्टे
या विशेष कोंबिंग ऑपरेशनचा उद्देश :
नवरात्र, दसरा व धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखणे
सराईत गुन्हेगार व फरार आरोपींवर नियंत्रण ठेवणे
नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे.
बेलतरोडी पोलीस ठाण्याने राबविलेल्या या प्रभावी कोंबिंग गस्त व नाकाबंदी मोहिमेद्वारे परिसरातील कायदा-सुव्यवस्थेची अंमलबजावणी प्रभावीपणे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलीस विभागाचा सर्व नागरिकांना संदेश :
आगामी सर्व सण-उत्सव शांततेत व सुरक्षिततेत साजरे करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे.










