अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ
संपादक संतोष लांडे
पुणे जिल्हा शाखेच्या वतीने नुकताच मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या TET बाबतच्या निकालाबाबत चर्चासत्राचे आयोजन RCM गुजराथी शाळा, पुणे येथे केलेले होते. या प्रसंगी शिक्षकांना नेहमीच मदत आणि मार्गदर्शन करणारे, त्यांना न्याय मिळवून देणारे अभ्यासू व निष्णात , मुंबई उच्च न्यायालयाचे वकील, ॲड. श्री. राहुल कदम साहेब यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल समजावून सांगितला. TET बाबत मा. उच्च व सर्वोच्च न्यायालयांनी निकालातील निरीक्षणे समजावून सांगितली. तसेच सर्व शिक्षकांनी त्यांना आपल्या मनात असलेले टीईटी बाबतचे प्रश्न आणि शंका विचारल्या त्याबाबतही कदम साहेबांनी सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. नारायण शिंदे, जिल्हा सचिव श्री जितेंद्र पायगुडे, राज्य उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर गायकवाड, राज्य सहसचिव श्री. विकास थिटे, पुणे शहराध्यक्ष श्री. संदीप सातपुते, महिलाध्यक्षा सौ. रसिका परब, शहर सचिव सौ. रूपाली आवाड उपस्थित होते. तसेच महासंघ जिल्हा उपाध्यक्ष श्री. दिपक भोसले सर, मावळ तालुकाध्यक्ष श्री. आनंद गावडे सर व इतर पदाधिकारी व महासंघाचे सन्माननीय पदाधिकारी व सभासद यांचीही उपस्थिती लाभली.










