अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रिन्स इंग्लिश स्कूलला तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत तृतीय क्रमांक.
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू :दि.19 सप्टेंबर 25 रोजी
एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत विज्ञानातील महिला’या विषयावर सादर केलेल्या नाट्याला तृतीय क्रमांक मिळवून शाळेची मान उंचावली आहे. या नाटकातून विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रातील महिलांचे योगदान आणि महिला सक्षमी करणाचा प्रेरणादायी संदेश प्रभावीपणे मांडला.या यशस्वी सादरीकरणामागे शाळेचे संगीत शिक्षक मिलिंद खंदारे यांनी घेतलेली अथक मेहनत महत्त्व पूर्ण ठरली. तसेच, विज्ञान शिक्षक नारायण चौरे आणि रविशंकर कुमार यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना उत्तम दिशा मिळाली. या सर्वांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी रंगमंचावर अप्रतिम सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला आणि प्रगती क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.








