अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत जि.प.प्रा.शा. कुंडीने पटकावला सर्व द्वितीय क्रमांक.
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू :दि.19 सप्टेंबर 2025 रोजी सेलू येथे संपन्न झालेल्या तालुका स्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत जि. प.प्रा.शा. कुंडी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘सुंदर माझं गाव’ या नाटकाचा तालुका स्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला.याच निमित्ताने शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी आनंददायी शनिवार
उपक्रमांतर्गत शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक राम गायकवाड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शा.व्य .समितीच्या अध्यक्षा सौ.शारदाताई गणेशराव मोगल, समिती सदस्या सौ. कालींदा भारतराव गोंडगे या होत्या. नाट्य स्पर्धेत कु. सिद्धी मारोती मोगल , गौरी भारत गोंडगे, वेदिका गोकुळ कटारे, भाग्यश्री नाना मोगल, यशराज हरिभाऊ मोगल, कार्तिक सुरेश चाळक, श्रीकृष्ण अभय जोशी व नागेश संतोष महाजन या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मोगल व श्रीमती. सुमिता सबनीस यांनी केले,तर आभार प्रदर्शन नागनाथ कलकोटे यांनी केले.










