रेल्वेच्या धडकेने युवकाचा मृत्यू खटकाळी रेल्वेगेटजवळ उलगडतोय रहस्य ओम विजय भिसे (१९, रा. साबलखेडा) याचा मृतदेह पहाटे रेल्वेरुळावर आढळून खळबळ
हिंगोली प्रतिनिधी श्रीकांत शिंदे
रेल्वेच्या धडकेने युवकाचा मृत्यू खटकाळी रेल्वेगेटजवळ उलगडतोय रहस्य
ओम विजय भिसे (१९, रा. साबलखेडा) याचा मृतदेह पहाटे रेल्वेरुळावर आढळून खळबळ
हिंगोली (प्रतिनिधी):
20 सप्टेंबर 2025
हिंगोली शहरालगत असलेल्या खटकाळी बायपास रेल्वेगेटजवळ शनिवारी (ता. २० सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास एका अज्ञात युवकाचा मृतदेह रेल्वेरुळांवर आढळून आला. प्राथमिक तपासात सदर युवकाला रेल्वेची जोरदार धडक बसल्याने मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पथक आणि रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तात्काळ पाहणी केली.
पोलीस उपनिरीक्षक राहुल महिपळे पो.का.संजय मार्के पोलीस कर्मचारी लेकुळे यांच्यासह रेल्वे पोलीस कर्मचारी
यांनी पंचनामा करून
मृताच्या खिशातून सापडलेल्या आधारकार्डवरून त्याची ओळख ओम विजय भिसे (वय १९, रा. साबलखेडा, ता. सेनगाव, जि. हिंगोली) अशी पटली आहे. ओम हा घरातून निघाल्यानंतर काही काळापासून बेपत्ता होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या संदर्भात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील पार्श्वभूमी स्पष्ट होण्यासाठी पुढील तपास सुरु आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली असून, तरुणाच्या मृत्यूमागे आत्महत्या की अपघात, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. पोलिसांकडून घटनास्थळी सविस्तर तपास करण्यात येत असून, शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे









