अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
बृहन्मुंबईचा दुर्व दळवी ठरला मोठ्या गटाचा विजेता…
मुंबई शाखेची सरशी
प्रतिनिधी गणेश तळेकर
बालरंगभूमी परिषद आयोजित आणि ॲड. नीलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून साकारलेली इतिहास महाराष्ट्राचा या स्पर्धेत बृहन्मुंबईचा दुर्व दळवी ठरला सर्वोत्कृष्ट.
इतिहास म्हटला कि आपल्याला सर्वांना एक विशेष आकर्षण असतेच. त्यात महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे अनेक प्रेरणादायी आणि अभिमानास्पद व्यक्तिमत्त्वे आपल्याला सर्वांच्याच हृदया जवळ असतात. याच इतिहासातून बालकलाकारांनी आणि बालप्रेक्षकांनी उर्जा आणि प्रेरणा घ्यावी या हेतूने ॲड. नीलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून साकारलेली आणि बालरंगभूमी परिषदेने आयोजित केलेली इतिहास महाराष्ट्राचा ह्या स्पर्धेची महाअंतिम फेरी १३ आणि १४ सप्टेंबर ला यशवंत नाट्यगृह, दादर येथे दिमाखदार स्वरुपात पार पडली.
या स्पर्धेच्या एकल मोठ्या गटात महाराष्ट्र भरातून २६ शाखां मधून एकूण ३७ स्पर्धक या महाअंतिम फेरी साठी निवडण्यात आले होते. सर्वांचे सदरीकरण उत्तम आणि कौतुकास्पद झाले. बृहन्मुंबईच्या दुर्व दळवी ने साकारलेले बाल शिवाजी आणि समर्थ मुंडे ,परभणी याने साकारलेले बहिर्जी नाईक यांनी प्रेक्षांच्या हृदयात घर केले. दुर्व दळवी ने साकारलेल्या रायरेश्वर शपथ हा प्रसंग महाअंतिम फेरीचे खास आकर्षण होता आणि सर्वोत्कृष्ट किताब पटकावून बृहन्मुंबई शाखेचा दुर्व दळवी मोठ्या गटाचा विजेता ठरला. या वेळी उपस्तिथ परीक्षक शाहीर नंदेश उमप , जेष्ठ अभिनेते सुनील गोडसे, शिवशाहीर प्रवीण जाधव आणि विजेत्याचे आणि बृहन्मुंबई शाखेचे विशेष कौतुक केले…..
