अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
नारायणगांव पोलिसांची कामगिरी; ईलेक्ट्रीक ॲल्युमिनियमच्या तारांचे बंडल चोरणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या..!! 3,50,000/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत..!!
कलावती गवळी पुणे जिल्हा प्रतिनिधी
( जुन्नर ता. ) नारायणगांव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मौजे. निमगांवसावा तसेच मांजरवाडी, शिरोली ते निमगांव सावा रोडचे कडेला असलेल्या सिध्दीविनायक मंदिराचे समोरील ट्रॅक्टरचे ट्राॅलीमध्ये ठेवलेले दोन ॲल्युमिनियमच्या तारांचे बंडल (कंडक्टर), मांजरवाडी येथील अमरदिप मल्टीकाॅन फर्मचे कामावरील सिमेंटचे 08 पोल तसेच लोखंडी 10 पोलवर बांधलेल्या अंदाजे 3500 मीटर ॲल्युमिनियमच्या तारांची आणि अक्षदा इंटरप्रायजेस फार्मव्दारे शिरोली सब स्टेषन पासुन निमगाव सावा नदीचे पुलापर्यतच्या पोलवरील बांधलेल्या एकुन 35 लोखंडी पोलवरील अंदाजे 6900 मीटर असे एकुण रु.6,25,000/- इतक्या किंमतीचे ॲल्युमिनियमच्या तारांची कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी करून नेले बाबत गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयाचे तपासादरम्यान नारायणगांव पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांचे मार्गदर्षनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, जगदीश पाटील, पोलीस हवालदार संदीप फड, मंगेश लोखंडे, पोलीस शिपाई सत्यम केळकर,सोमनाथ डोके, टिलेश जाधव,महीला पोलीस शिपाई कविता गेंगजे यांनी सदर अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना सी.सी.टि.व्हि.फुटेज, गोपनीय बातमिदार, तसेच तांत्रीक विश्लेषनाच्या आधारे शोध घेतला असता सदर गुन्हयात चेेैतन्य छबु साळुंके, (वय 24) रा. सुलतानपुर, ता. जुन्नर, जि. पुणे) आणि विकास देवराम कु-हाडे, रा.सुलतानपुर, ता.जुन्नर, जि.पुणे (फरार आरोपी) याचे मदतीने इलेक्ट्रीक ॲल्युमिनियमच्या तारांचे बंडल ( कंडक्टर ) तसेच पोलवरील ॲल्युमिनियमच्या तारांची चोरी केलेचे निष्पन्न झाल्याने आरोपी नामे 1) चेेैतन्य छबु साळुंके यास दिनांक 16/09/2025 रोजी 21ः54 वा. अटक करणेत आली असुन सदर आरोपीस मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो केार्ट जुन्नर यांचे समक्ष हजर करण्यात आले असता मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो केार्ट जुन्नर यांनी अटक आरोपी यांस 03 दिवस पोलीस कस्टडी मंजुर केली आहे. तसेच सदर गुन्हयात आणखी एक आरोपी नामे महेंद्र नवनाथ थोरात यास निष्पन्न करून दिनांक 18/09/2025 रोजी 22ः31 वा अटक करण्यात आले असुन त्यास आज रोजी मा. मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो केार्ट जुन्नर यांचे समक्ष हजर करण्यात येणार आहे. यातील अटक आरोपी यांचेकडुन एकुण 3,50,000/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन दोन्ही आरोपी सध्या पोलीस कस्टडीत आहेत. सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार संदीप फड हे करीत आहेत. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील स्था.गु.शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक महादेव शेलार,पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे , जगदीश पाटील,पोलीस हवालदार मंगेश लोखंडे, संदीप फड, पोलीस शिपाई गोविंद केंद्रे, सत्यम केळकर, सोमनाथ डोके,गोरक्ष हासे, टिलेश जाधव, जितेंद्र पाटील, शुभम खांडगे, आनंदा चौगुले, अक्षय सोनवणे महिला पोलीस शिपाई कविता गेंगजे, सोनाली रघतवान,धनश्री फापाळे, शुभांगी दरवडे तसेच स्थानीक गुन्हे शाखेचे सहा.पो.फौजदार दिपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, पोलीस शिपाई अक्षय नवले आदीं पोलिस या कारवाईत सहभागी झाले होते.








