अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
नागपूर अक्टिंग वर्कशॉप चे उद्घाटन
प्रतिनिधी -सारंग महाजन
“विदर्भाच्या “मातीत अनेक कलाकार दडलेले आहेत. या कलाकारांचे चित्रपट क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर
नावलौकिक करावे असे कलावंत या अभिनय शाळेतून घडावे “असे प्रतिपादन आजच्या 8 दिवशीय अभिनव कार्यशाळेच्या “उद्घाटन प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते चित्रपट निर्माते व कार्यक्रमाचे उद्घाटक नरेंद्र जिचकर यांनी केले.
अध्यक्षस्थानी पत्रकार प्रमोद काळबांडे होते तर प्रमुख अतिथी शास. कला व अभिकल्प महाविद्यालयाचे प्रोफेसर संजय जठार होते. शुभ कास्टिंग प्रोडक्शन आयकॉनिक डिजिटल मीडिया आणि शास. कला व अभिकल्प महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या अभिनय कार्यशाळेचा पहिला दिवस अत्यंत उत्साहात पार पडला.
नागपूर व विदर्भातील कलावंतांना अभिनय क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन मिळावे व त्यांच्या अभिनय कलेला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने अॅक्टींग वर्कशॉप चे आयोजन केले आहे. आयोजक शुभ कास्टिंग फिल्म प्रोडक्शन चे प्रशांत यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता युवनाते यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयकॉनिक डिजिटल मीडिया चे नितीन काळबांडे, प्रकाश त्रिवेदी पुजा धीमन, पंकज ओंकार, रमेश खातखेडे, सोनिया वखारे, सुश्रुत काळबांडे यांनी सहकार्य केले. हे वर्कशॉप हे वर्कशॉप दि.20 नंबर पर्यंत शासकीय कला अभिकल्प महाविद्यालय नागपूर येथे सुरू राहणार आहे.









