अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
वसमत येथे लायन्स क्लब मार्फत रांगोळी स्पर्धा संपन्न आयोजन
प्रतिनिधी श्रीहारी अंभोरे पाटील
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी लालबहादूर शास्त्री विद्यालय वसमत येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी लायन्स क्लब वसमत प्राईड व एलबीएस विद्यालय वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून एलबीएस शाळेचे अध्यक्ष श्री संदीप चव्हाण सर उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून लायन्स क्लब वसमत प्राईड चे अध्यक्ष श्री राजू सिद्धीकी साहेब,बाळासाहेब बेले,संजीव बेंडके ,प्रसन्ना देशपांडे,उपस्थित होते.हैदराबाद मुक्ती संग्रामातील विविध प्रसंगावर विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून आपल्या कलेचा आविष्कार केला. तज्ञ परीक्षकांच्या मूल्यमापनाने या रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय व तृतीयअसे पाच क्रमांक काढून विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रास्ताविक पर मनोगतात श्री बाळासाहेब बेले यांनी मानवी जीवनात कलेचे महत्व विविध उदाहरणांशी पटवून दिले तर लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री सिद्धी कि सर यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर आपल्यातील कला गुण ओळखून त्याचा विकास करण्याचा प्रयत्न केल्यास भविष्यात त्या त्या क्षेत्रात तुम्हाला नाव उज्वल करण्याची संधी असल्याचे मत व्यक्त केले. श्री संदीप चव्हाण सर यांनी अध्यक्षीय भाषणात लायन्स क्लबचे आभार मानून एलबीएस शाळेत घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाविषयी माहिती देऊन कलेचे महत्त्व प्रतिपादन केले. या वेळी विशेष म्हणजे रांगोळी स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक मुलांच्या ग्रुप चा आला.यावेळी 60 सहभागी विद्यार्थी यांना बक्षीस देण्यात आले.
यावेळी लायन्स क्लबचे उपाध्यक्ष कल्याण कुरुंदकर, समीर कुरेशी, राजाराम जगताप, एडवोकेट अरुण आंबेकर, विक्रम कुंटूरवार, आलोक जाधव, सीए जगताप साहेब, डॉक्टर वैभव पडोळे, डॉक्टर सागर सातपुते, डाके आप्पा, हरिहर अल्सटवार, गौस भाई बागवान, माजी अध्यक्ष योगेश चेपूरवार, भारत गुजराती, एडवोकेट प्रदीप देशमुख, वैजनाथ कदम, प्राध्यापक भिंगोले सर तसेच एल बी एस. शाळेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








