अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या नवीमुंबई जिल्हा अध्यक्षपदी गजानन भोईर.
प्रतिनिधी दौलत सरवणकर नवी मुंबई
नवीमुंबई महानगरपालिकेमधील कंत्राटी कामगारांची सर्वात मोठी संघटना म्हणजे समाज समता कामगार संघटना होय. समाज समता कामगार संघटनेच्या पदाधिकारयांनीच वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन मध्ये प्रवेश केल्याने समाज समता कामगार संघटनेला खिंडार पडाले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या कार्याने प्रेरित असल्याने व वंचित बहुजन आघाडीचे ॲड. उमेश हातेकर यांच्या कार्याने प्रभावित होऊन वंचित बहुजन आघाडीच्या कामगार संघटनेत प्रवेश करत असल्याचे गजानन भोईर यांनी सांगितले. समान काम समान वेतन, वाढीव पगार, कायम स्वरुपी अशा विविध समस्यां वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्याकडे गजानन भोईर यांनी मांडल्या. गजानन भोईर आणि त्यांची सर्व कमिटी हे नवीमुंबई महानगरपालिके मधील कंत्राटी कामगारयांच्या भेटी घेत त्यांना वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सभासद होण्यासाठी साद घालत आहेत. कंत्राटी कामगारांकडुन सुद्धा त्यांना योग्य तो प्रतिसाद येत आहे. लवकरच नवीमुंबई मध्ये वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचा कामगार मेळावा होणार आहे. समाज समता कामगार संघटनेमधील ९० टक्के सभासद हे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन मध्ये प्रवेश करणार असल्याचे गजानन भोईर यांनी सांगितले. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस सुरेश मोहिते यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देत नवीमुंबईच्या जिल्हा अध्यक्षपदी गजानन भोईर, उपाध्याक्षपदी सुनिल शिर्के, संतोष पाटील, राहुल जाधव, सरचिटणीसपदी विनायक गुप्ते, खजिनदार पदी सुभाष साळुंखे, सहसचिव पदी अजय पवार, अक्षय जाधव, भास्कर ढोबळे व इतर असे २७ जणांची कार्यकारणी घोषित करण्यात आली.








