छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील माॅसाहेब यांच्या पुतळ्यावर काही समाजकंटकांनी लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केला ह्या दुर्देवी घटनेचा जाहीर निषेध
प्रतिनिधी मुकूंद मोरे मुंबई महाराष्ट्र
शिवाजी महाराज पार्क येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे ह्यांच्या पुतळ्यावर काही समाजकंटकांनी लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केला. ह्या कृतीचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी देखील आवाज उठवला.
पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवजी ठाकरे आणि युवासेनाप्रमुख,शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी ह्याच घटनेच्या पार्श्वभूमीवर आज घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच माँसाहेबांना वंदन केले.
वंदनीय दिवंगत माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील पुतळ्यावर अज्ञात समाजकंटकाने लाल रंग फेकल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. महायुती सरकारच्या द्वेषी राजकारण आणि कोलमडून पडलेल्या कायदा आणि सुव्यस्थेमुळे राज्यात माणसांसोबत पुतळे देखील सुरक्षित राहिले नाही. कायदा आणि सुव्यस्था राखण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. या दुर्दैवी घटनेचा जाहीर करण्यात आला
ह्यावेळी शिवसेना नेते, सचिव, खासदार अनिल देसाई, मनसे नेते बाळा नांदगावकर, विभागप्रमुख, आमदार महेश सावंत तसेच शिवसैनिक उपस्थित होते.










