अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
२० वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा २०२५ चा उद्घाटन समारंभ.भा. पो.से.श्री. दत्तात्रय पडसगोलकर यांच्या हस्ते संपन्न.
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
पुणे :आज दि. १७/०९/२०२५ रोजी १७.०० वाजता राज्य राखीव पोलीस दल, गट क्र. २, पुणे येथील अलंकारन हॉल येथे प्रमुख पाहुणे सेवा निवृत्त भा.पो.से. श्री दत्तात्रय पडसलगोकर, गुणश्री संचालक, महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी, पुणे. यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. श्री सुनील रामानंद, अपर पोलीस महासंचालक, गु.अ.वि., पुणे यांनी प्रमुख पाहुणे यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. स्पर्धेत सहभागी २६ संघांनी प्रमुख पहुण्यांना मानवंदना दिली.
श्री सुनील रामानंद यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व ६२ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा लखनऊ उत्तर प्रदेश येथे पार पडला. महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या संघाने प्रथम क्रमाकांचा संत्र म्हणून जनरल पॉम्पियन ट्राफी मिळवुन महाराष्ट्र पोलीस दलासाठी ऐतिहासीक कामगिरी केलो आहे. त्याचप्रमाणे ६६ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा, भोपाळ मध्ये पार पडला. महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या संघाने देशातील द्वितीय क्रमांकाचा संघ म्हणुन रनरअप ट्रॉफी मिळवुन महाराष्ट्र पोलीस दलासाठी उल्लेखनिय कामगिरी केली आहे. ६७ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा, लखनऊ, उत्तर प्रदेश येथे पार पडला. महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या संघाने ०७ पदकांची कमाई करुन तृतीय क्रमांक पटकाविला आहे. मागील वर्षी ६८ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा, रांची, झारखंड येथे पार पडला. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलाच्या संघाने चार पदकांची कमाई करुन सुर्या श्वान, सातारा जिल्हा याने गोल्ड मेडल पटकावले आहे. तसेच व्हिडीओग्राफी स्पर्धा प्रकारामध्ये रनरअप ट्रॉफी पटकावलेली आहे.
२० व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याच्या विजेते स्पर्धक यांनी देखील अशाच प्रकारे उज्वल कामगिरी करुन, आगामी ६९ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये दैदिप्यमान कामगिरी करुन महाराष्ट्र पोलीसांची प्रतीमा उंचावतील अशी आम्ही आशा करतो.
प्रमुख पाहुण्यांचे हस्ते गतवर्षीच्या ६८ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये पदक विजेत्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी स्पर्धकांना व उपस्थितांना अशा प्रकारचा पोलीस कर्तव्य मेळावा अधिकारी व अंमलदार यांच्यातील तपासाचे कौशल्य वाढीस उपयुक्त आहे, असे नमुद केले. तसेच पदक विजेत्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्पर्धेतील कौशल्याचे व्हिडिओ तयार करून तो प्रत्येक पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रसारीत करावा जेणेकरून, सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल असे सांगितले. सर्व पदक विजेत्यांच्या कौशल्याचा वापर महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांना करण्याचे आवाहान केले. तसेच स्पर्धकांना यास्पर्धे मध्ये भाग घेणे हे स्वतःमध्येच प्राविण्य असलेबाबत सांगितले. स्पर्धकांना निकोप व खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा पार पाडण्याविषयी मार्गदर्शन करुन आगामी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याकरिता शुभेच्छा दिल्या व औपचारिकरित्या स्पर्धेचे उद्घाटन केले. ६८ व्या अखिल भारतीय कर्तव्य मेळाव्यामध्ये महाराष्ट्राला सुवर्ण पदक प्राप्त करून देणा-या, श्री राहुल नळकांडे, पोलीस उप निरीक्षक, नाशिक शहर व श्री निलेश दयाळ, पो.हवा. व.न. ८०८, नेमणूक श्वानपथक सातारा यांना उद्घाटन ज्योत आणण्याचा मान देण्यात आला. १९ व्या महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळाव्यात जनरल चॅम्पीयनशिप ट्रॉफी पटकविणाऱ्या, नागपूर शहर चे संघप्रमुख श्री प्रशांत टावरे, पोलीस निरीक्षक यांनी स्पर्धकांना शपथ दिली.
सदर कार्यक्रमास खालील प्रमाणे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
१. श्री सुनील रामानंद, अपर पोलीस महासंचालक, गु.अ.वि., म.रा., पुणे,
२. श्री सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक, कारागृह, म.राज्य, पुणे,
३. डॉ. राजेंद्र डहाळे, विशेष पोलीस महानिरीक्षक, (रा.गु.अ.के.) गु.अ.वि., म. राज्य, पुणे,
४. श्री शशिकांत महानवर, पोलीस सह आयुक्त, पिंपरी-चिंचवड शहर,
५. श्री सुधीर हिरेमठ, विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे-पश्चिम, गु.अ.वि., म. राज्य, पुणे,
६. श्री विजयकुमार मगर, पोलीस उप महानिरीक्षक, एस.आर.पी.एफ., पुणे,
७. श्री एम. रामकुमार, संचालक, एम.आय.ए., पुणे,
८. श्री बसवराज तेली, पोलीस उप महानिरीक्षक, (आर्थिक) गु.अ.वि., म.रा., पुणे,
९. श्री अमोघ गावकर, पोलीस उप महानिरीक्षक, (प्रशासन) गु.अ.वि., म.रा., पुणे,
१०. श्रीमती तेजस्वी सातपुते, समादेशक एस.आर.पी.एफ. गट क्र. १
११. श्रीमती पल्लवी बर्गे, (का. व सं.), गु.अ.वि., म.राज्य, पुणे,
हजर होते. तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तसेच प्रिन्ट व इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे प्रतिनिधी
२० व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा २०२५ मधील स्पर्धांचे आयोजन दिनांक १५/०९/२०२५ ते १९/०९/२०२५ या कालावधीत राज्य राखीव पोलीस दल, गट क्र. १ व गट क्र. २ तसेच महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे येथे गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मार्फत करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. राजेंद्र डहाळे, विशेष पोलीस महानिरीक्षक, (रा.गु.अ.कें.) गु.अ.वि., म. राज्य, पुणे यांनी केले तसेच सुत्रसंचलन श्रीमती अर्चना कदम, पोलीस निरीक्षक, गु.अ.वि., म.रा. पुणे व श्री सचिन देवडे, पोलीस नाईक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.२ यांनी केले.









