बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (st) प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी राज्यभर निवेदन मोहीम: पुण्यात निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
पुणे प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार तातडीने अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी करत निवेदन मोहीम राबविण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालय येथे मा.ज्योतिताई कदम, जिल्हाधिकारी निवसी यांच्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले. या मोहिमेचे आयोजन बंजारा हृदयसम्राट धर्मनेता मा.किसनभाऊ राठोड यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष मा.विलास भाऊ राठोड आणि प्रदेशाध्यक्ष मा.भिकन भाऊ जाधव यांच्या आदेशान्वये करण्यात आले.
निवेदन देताना प्रदेश उपाध्यक्ष मा.प्रेमकिसन राठोड म्हणाले,
“आमचे अधिकार आम्ही मागत आहोत. ब्रिटिश व निजामशाहीच्या काळात आम्ही येथील मूळ आदिवासी आहोत, याची नोंद हैदराबाद गॅझेटमध्ये स्पष्ट आहे. महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय चुकीमुळे आम्हाला VJNT प्रवर्गात टाकण्यात आले. परंतु आज बंजारा समाज जागा झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाज पेटून उठला असून सनदशीर मार्गाने आपला हक्क मिळवण्यासाठी सज्ज आहे. कृपया ही आमची आर्त हाक आणि भावना तातडीने मुख्यमंत्री पर्यंत पोहोचवावी.”
या प्रसंगी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष मा.प्रेमकिसन राठोड, जिल्हाध्यक्ष मा.रमेश नानाभाऊ राठोड, साहित्य परिषदेचे डॉ. सुभाष राठोड, जिल्हा संघटक मा.सुभाष भाऊ राठोड, विभागीय सदस्य मा.संतोष भाऊ राठोड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.चंदरभाऊ राठोड, तालुका अध्यक्ष मा.विलास पवार, मा.लक्ष्मण भाऊ राठोड, मा.महेश भाऊ राठोड, मा.सुंदरजी आडे तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
निवेदनाद्वारे केंद्र व राज्य शासनाने तातडीने कार्यवाही करून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली.
