बलात्कार प्रकरणात कठोर कारवाई व्हावी.
अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन
प्रतिनिधी: गोपाळ भालेराव
अकोला : आज दि. १२सप्टेंबर २०२५ रोजी…जिल्हाधिकारी अकोला येथे सर्व संघटना तर्फे निवेदन देण्यात आले
०६ सप्टेंबर २०२५ रोजी अकोला शहरात गणपती विसर्जन करायचे दिवशी एका गरीब कुटुंबातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि छेडछाडीची गंभीर घटना उघडकीस आली आहे.या घृणास्पद कृत्याविरुद्ध अकोला जिल्ह्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला यात सम्राट अशोक सेनेने सुद्धा सहभागी होऊन आरोप्याला फाशी झाली पाहिजे हि मागणी केली, भीम नगर मधील सर्व भीमसैनिक या सकल हिंदू जन आक्रोश मोर्चात सहभाग होते.या अमानुष घटनेचा सर्वांनी तीव्र निषेध केला आणि म्हटले,गुन्हेगाराला,मग तो कोणत्याही समुदायाचा असो,या गुन्हेगाराला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. त्याचा सार्वजनिक रित्या इन काउंटर केला पाहिजे असे क्रूर कृत्य करणारा व्यक्ती कोणत्याही समुदायाचा नाही.अकोला जिल्ह्याला लागलेला हा कलंक आहे हा कलंक त्याला फाशी झाली पाहिजे नाहीतर एन्काऊंटर झाला पाहिजे तरच हा कलंक मिटणार आम्ही सर्व.मुलीच्या आणि तिच्या कुटुंबासोबत उभे आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू,पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळावा आणि गुन्हेगाराला कायद्यानुसार शक्य तितकी कठोर फाशी नाहीतर एन्काऊंटर व्हावे हे शिक्षा मिळावी अशी आम्ही मागणी करतो.या प्रशासनाकडे.
संपूर्ण बौद्ध समाज.
सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य
आकाश दादा शिरसाट यांनी
आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी केली
