अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
डॉ. दत्ता तपसे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला 2000 रुग्णांची उपस्थिती, 1500 रुग्णांनी घेतला महाआरोग्य तपासणी शिबिराचा लाभ.
प्रतिनिधी सारंग महाजन
12 सप्टेंबर 2025 जिल्हा -बीड ,तालुका केज, राम वडगाव सध्या कार्ला येथे वैद्यकीय सेवा देणारे एम .बी. बी .एस. गट ” अ ” वैद्यकीय अधिकारी तसेच राजमुद्रा मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ .दत्ता तपसे यांचा वाढदिवसानिमित्त महाआरोग्य तपासणी शिबिराने साजरा करण्यात आला.
डॉ. दत्ता तपसे विविध महाआरोग्य शिबिर , गुणवंतांचा सत्कार समारंभ, शालेय साहित्य वाटप व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरामध्ये रक्तदाब शिबिर, रक्त तपासणी शिबीर, हाडांचे आजार , स्त्री रोग तपासणी, दंत रोग तपासणी ,कर्करोग तपासणी , नेत्ररोग तपासणी. अशा विविध तपासण्या करण्यात आल्या असून 1500 लोकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. तसेच सेवानिवृत्त स्वातंत्र्य सैनिक आशा स्वयंसेविका यांचा यांचा सत्कार समारंभ पार पडला. डॉ. तपसे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व शिबिराचे आयोजन राजमुद्रा मेडिकल फाउंडेशन ,वृक्षवल्ली सेवाभावी संस्था ,उदयगिरी, लायन्स मित्र रुग्णालय लाइफ सक्सेस फाउंडेशन मार्फत करण्यात आले. महाआरोग्य तपासणी शिबिराकीरता जवळपासच्या दोन हजार लोकांनी आपली उपस्थिती नोंदविले असे राजमुद्रा मेडिकल फाउंडेशनचे सचिव ज्ञानेश्वर गिरी यांनी सांगितले असून पत्रकार सारंग महाजन यांनी सुद्धा डॉ. दत्त तपसे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
