बायको असताना, बाई च्या नादात पडला, बीडच्या उपसरपंचाने सोलापुरात जीवन संपविले, सोलापूर आणि बीड जिल्हा हादरला..!!
माधवी गिरी गोसावी ( सोलापूर जिल्हा ) प्रतिनिधी. बाई आणि बाटली चा नाद एखाद्याला लागला तर एखाद्याचे कुटुंब संपते ही अगदी खरी गोष्ट आहे. असाच प्रकार बीडमधल्या गेवराई लुखामसल गावच्या माजी उपसरपंचाबद्दल सोलापुरात धक्कादायक घटना घडली आहे. त्याने आपल्याला बायको मुलै असताना तो एका कला केंद्रातील नर्तिकेच्या प्रेमात चांगलाच व्याकुळ झाला होता. गोविंद बर्गे (वय 38 ) हा माजी उपसरपंच म्हणून गावांमध्ये काम पाहत होता. त्याचे सोलापुरातील बार्शी तालुक्यांतील सासुरे गावातील पूजा गायकवाड तिच्याबरोबर ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले अखेर दीड दोन वर्षे त्यांच्या प्रेमाला झाले होते. अखेर सरपंचाने नर्तिकीच्या घराजवळ स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली या घटनेनंतर गोविंद यांच्या मेव्हण्याने वैराग पोलीस ठाण्यात तक्रार दिली पूजा गायकवाड या नर्तिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला. गोविंद बर्गे यांच्या मेव्हण्याने दिलेल्या फिर्यादीत गेवराईचा बंगला माझ्या नावावर कर आणि पाच एकर जमीन माझ्या भावाच्या नावावर कर, असा आग्रह पूजा हिने गोविंद याच्याकडे धरला होता. तसेच मागणी मान्य न केल्यास तुझ्यावर मी बलात्कारांचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील दिली होती. त्यामुळे गोविंद हा काही दिवसांपासून प्रचंड तणावाखाली होता. पूजाने देखील गोविंद सोबत बोलणे बंद केले होते. त्यामुळे गोविंद हे पूजेच्या बार्शी तालुक्यातील सासुरे येथे गेला होता. दोघांमध्ये नेमकं काय वाद झाला किंवा काही चर्चा झाली हे या दोघांनाच माहिती होतं. अखेर गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणात पूजा गायकवाड हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असुन. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
