एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

एरंडोल येथे रोटरी क्लबची झाली स्थापना

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

एरंडोल येथे रोटरी क्लबची झाली स्थापना
चार्टर अध्यक्ष पदी डॉ.नरेंद्र ठाकूर तर मानद सचिवपदी प्रा .सोपान साळुंखे यांनी स्वीकारला पदभार.

प्रतिनिधी स्वप्निल बोरसे 

एरंडोल येथे नव्यानेच स्थापन झालेल्या रोटरी क्लब एरंडोल चा पद्ग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात डी.डी.एस.पी.महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.मुख्य अतिथी म्हणून रोटरीचे प्रांतपाल रो . ज्ञानेश्वर शेवाळे (३०३०) , रोटरीचे माजी प्रांतपाल रो . मंजू फडके , सहप्रांतपाल धनराज कासट यांची उपस्थिती होती .
याप्रसंगी रोटरीचे प्रांतपाल रो . ज्ञानेश्वर शेवाळे यांनी रोटरी इंटरनॅशनल हि १०० वर्षाचा इतिहास असलेली , २०० पेक्षा जास्त देशामध्ये विस्तारलेली अशी सगळ्यात मोठी स्वयंसेवी संस्था असल्याचा उल्लेख करत ” सेवा सर्वोपरी ” याप्रमाणे अनेक सेवाप्रकल्प राबवित असल्याचे प्रतिपादन केले .
मुख्य अतिथींचा परिचय प्रा . राखी पाटील यांनी करून दिला .
सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या रो.मंजू फडके यांनी रोटरीचे फायदे व नव्यानेच रोटरी सदस्य झालेल्या व्यक्तीच्या आयुष्यात , व्यवसायात ” रोटरियन ” झाल्यावर व्यक्तिमत्वात होणारा परिपूर्ण व आदर्श बदल बद्दल मार्गदर्शन केले . रोटरी ने जगातील सगळ्यात मोठ्या अश्या आर्थिक दातृत्वाच्या माध्यमातून यशस्वी केलेली ” पोलिओ निर्मूलन मोहीम ” हि प्रत्येक रोटरियन साठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले .एरंडोल रोटरी क्लब च्या माध्यमातून
समाजातील वंचित घटकांपर्यंत सेवा पोहोचविणे, शिक्षण, आरोग्य व पर्यावरण या क्षेत्रांतील उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविले जातील, असा विश्वास या वेळी त्यांनी व्यक्त करून नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले .
रोटरी क्लब ऑफ एरंडोलचा हा पद्ग्रहण सोहळा हा केवळ औपचारिकता न ठरता समाजहिताच्या कार्यासाठी एक नवा संकल्प ठरेल अशी भावना एरंडोल रोटरी क्लब चे मुख्य प्रवर्तक ऍड . ओम त्रिवेदी यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली . एरंडोल रोटरी क्लब चे नवनियुक्त अध्यक्ष डॉ . नरेंद्र ठाकूर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केलेल्या आपल्या मनोगतात
आगामी वर्षातील कामाचा ध्यास मांडत “सामाजिक सेवेतून समाधान” हा मंत्र जपण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे कोषाध्यक्ष पदी अरुण माळी व वैद्यकीय समिती प्रमुख म्हणून डॉ . फरहाज बोहरी यांच्या समवेत इतर समिती प्रमुख यांच्याकडे हि पदभार सोपविला .रोटरी क्लब एरंडोल चे मानद सचिव प्रा . सोपान साळुंखे यांनी कार्यात पारदर्शकता व सातत्य ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
याप्रसंगी व्यासपीठावर जळगाव सेंट्रल क्लब चे अध्यक्ष रो . जितेंद्र बरडे , मानद सचिव केतन ढाके , महेंद्र रायसोनी यांची उपस्थिती होती .पद्ग्रहण सोहळ्याप्रसंगी जळगाव सेंट्रल क्लब चे पदाधिकारी , पाचोरा क्लब चे डॉ . मुकेश तेली , जळगाव क्लब चे डॉ .राहुल मयूर , डॉ तुषार फिरके , एरंडोल शहरातील मान्यवर अमित पाटील , प्रा . अनिल लोहार , प्रा. अनिल पाटील ,डॉ .राजेंद्र चोधरी , संजय जाधव ,विजय जाधव ,जगदीश पाटील , ऍड .नितीन चोधरी , कृष्णा धनगर , डॉ . गीतांजली ठाकूर , , ,प्रा . विजय शास्त्री , रूपा शास्त्री ,लीलाधर पाटील ,प्रा.स्वाती शेलार ,डॉ अम्बरीन बोहरी ,डॉ . राहुल वाघ , डॉ . मुकेश चोधरी , डॉ उमेश पाटील , कल्पेश कलंत्री ,सुभाष पवार , उल्हास लड्ढा ,डॉ प्रीती चोधरी ,नानासाहेब पारखे , ऍड.मधुकर देशमुख, शिवाली पाटील , महेंद्र चोधरी ,राहुल शिंपी , जाखीटे ,तेजस पाटील , डॉ. आंचल पाटील ,सचिन जैन , संदीप जाखिटे , ज्ञानेश्वर महाजन ,तुषार मोने , हेमंत शर्मा , चंद्रकांत पारखे ,योगेश काबरा , गणेश बडगुजर ,शेखर पाटील, विशाल तिवारी , किशोर देवरे आदी उपस्थित होते .
यावेळी शहरातील पत्रकार उपस्थित होते.
रोटरी एरंडोल क्लब च्या पद्ग्रहण सोहळ्याचे सूत्रसंचलन जळगाव सेंट्रल रोटरी क्लब च्या अपर्णा भट – कासार यांनी तर आभार एरंडोल रोटरी क्लब च्या उपाध्यक्षा डॉ . जुमाना बोहरी यांनी केले .

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link

error: Content is protected !!