अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पोलादपूरकरांसाठी अभिमानाचा क्षण अभिनंदन,
प्रतिनिधी मुकूंद मोरे रायगड जिल्हा
इवलेसें रोप लावियेलें द्वारी,
त्याचा वेळू गेला गगनावरी
ही ओळ आज ज्यांच्यावर अक्षरशः खरी उतरते,
ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके,
सन्माननीय श्री.कृष्णा दादा कदम
वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि समाजसेवेचा खरा चेहरा
पोलादपूर तालुक्याचा सुपुत्र, कोकणवासीयांचा अभिमान, आणि संपूर्ण महाराष्ट्रातून एकमेव निवडलेले व्यक्तिमत्व
केके दादा
Atal Foundation, Delhi कडून
National Award 2025
हा राष्ट्रस्तरीय सन्मान 19 सप्टेंबर 2025 रोजी दिल्ली येथे प्रदान होणार आहे
हा केवळ एक पुरस्कार नाही
ही आहे त्यांच्या हजारो रुग्णांना दिलेल्या वेळेवर मदतीची
निरपेक्ष सेवाभावाची, आणि
रात्री-अपरात्री धावून जाणाऱ्या देवदूत वृत्तीची दखल
वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून
अपघातग्रस्तांसाठी तातडीची सेवा
रक्तदात्यांचं भक्कम जाळं
मोफत औषधोपचार व सल्ला
समाजात माणुसकीची मशाल उजळणं
या प्रत्येक कामाला आता दिल्लीच्या व्यासपीठावरून सलाम मिळतोय
के के साहेबांचं काम आम्ही जवळून पाहिलंय
कधी अपघातस्थळी, कधी रक्तपेढीत
कधी रुग्णांच्या घराबाहेर,
तर कधी ICU च्या दारात
प्रत्येक ठिकाणी ‘कोणीतरी आहे आपल्यासाठी’ अशी भावना देणारा चेहरा म्हणजे केके दादा
खरंच, आज शब्द अपुरे पडतात
ह्या निस्वार्थ कामाची, झगड्याची, लोकसेवेची खरी पोचपावती आता दिल्ली दरबारी मिळतेय
हे आमचं भाग्य आहे आणि आमचा स्वाभिमानही
आम्ही पांडुरंग चरणी प्रार्थना करतो
केके दादा उत्तम आरोग्य लाभो
अजून मोठ्या संधी मिळोत,
आणि लोकसेवेचा वटवृक्ष असाच बहरत राहो
केके दादांच्या धर्मपत्नी व त्यांच्या संपूर्ण टीमचेही विशेष कौतुक
एक खंबीर पाठबळ हे अशा यशामागे असतंच आणि इथे ते नक्की जाणवतं
श्री मुकूंद मोरे यांच्याकडून के के दादांना शतशः शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन
