भावपूर्ण श्रद्धांजली
ता. पोलादपूर मु. पो.कोतवाल खुर्द रेववाडी गावचे सुपुत्र कॅप्टन ह भ प वै. देवजी रामजी चव्हाण साहेव यांचे शुक्रवार दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी वय वर्ष ८८ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
प्रतिनिधी मुकूंद मोरे
कॅप्टन देवजी चव्हाण साहेब हे आर्मी मध्ये देशसेवा करीत असताना आपल्या माय भूमीकडे कर्मभूमी मध्ये विशेष लक्ष देत होते. सन १९८० मध्ये श्री हनुमान मंदिर रेववाडी येथे श्री राधा कृष्ण मूर्ती सौजन्य देऊन १९८२ मध्ये मंदिर जीर्णोद्धार साठी विशेष परिश्रम घेतले.
राधाकृष्ण सेवा संस्थेचे ते संस्थापकीय मार्गदर्शक होते. लोअर परेल येथे त्यांच्या निवासस्थानी राधा कृष्ण मंडळाची नियमित मिटिंग होत असे.
आर्मी सेवेत असतांना कॅप्टन चव्हाण साहेबांनी अनेक मुलांना देश सेवेत नोकरीं मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
सेवा निवृत्तीनंतर जेएनपीटी या कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून अनेक वर्ष काम केले. या कंपनीतून सेवानिवृत्ती झाल्यानंतर.
कर्मभूमी कोतवाल रेववाडी येथे वास्तव्य करीत असताना नायक मराठा समाज, बहुजन समाज, माजी सैनिक संघटना, वारकरी संप्रदाय विविध ठिकाणी काम करुन आपल्या कार्याचा ठसा उमठवीला होता.
वारकरी संप्रदायाची दीक्षा घेऊन, अखंड हरिनाम सप्ताह, श्रावण महिन्यात ग्रंथ वाचन,भजनामध्ये नियमित्त पुढाकार असायचा.
उच्च विचारसरणी, शांत स्वभाव असणारे आमुचें कॅप्टन देवजी चव्हाण हे गौरी गणपती विसर्जन च्या दुसऱ्या दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांशी बोलत चालत असताना शुक्रवार दिनांक ०५ सप्टेंबर २०२५ रोजी ईश्वरी कृपेने देवाज्ञा झाले.
चाले हे शरीर कोणाचीया सत्ते !
कोण बोलाविते हरी वीण !!
आपल्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.आपल्या कर्तुत्वाची नियमित्त आठवण येत राहील.
ईश्वर आपल्या आत्म्यास चिरशांती देवो ! ही विनम्र प्रार्थना
राधा कृष्ण सेवा संस्थेच्या वतीने
!!भावपूर्ण श्रध्दांजली
