अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी उरण मध्ये जोरदार निदर्शने
जनसुरक्षा कायदा रद्द व्हावा या प्रमुख मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन पक्षप्रमुख सन्मानीय श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उरण शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन निदर्शने केली. या कार्यक्रमात शिवसेना उद्धवजी ठाकरे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, क्रांतिकारी पक्ष, उरण सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, प्रमुख राजकीय नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या वेळी माजी आमदार मनोहर भोईर, कॉम्रेड भूषण पाटील, कॉग्रेसचे विनोद म्हात्रे, राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर, शेकापचे रवी घरत, सामाजिक कार्यकर्ते सत्यवान ठाकूर, सुधाकर पाटील यांनी लोकशाही विरोधी जन सुरक्षा कायदा रद्द करा या विषयावर मांडणी केली. तर सत्ताधारी भाजप युतीवर सडकून टीका केली. राज्य सरकारने मंजूर केलेल्या जनसुरक्षा कायद्याला विरोध करण्यासाठी आज उरण शहरातील गांधी पुतळा येथे महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
सर्वत्र या कायद्याला विरोध होत असून उरण मध्येही जन सुरक्षा कायद्याला मोठया प्रमाणात विरोध पहायला मिळाला. निदर्शनें केल्या नंतर सर्व निदर्शक मोर्चाने गणपती चौक,जरीमरी मंदिर मार्गे उरण तहसीलदार कार्यालयावर गेले व निवेदन सादर केले.
