अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकवणाऱ्या दोन आरोपींना वालचंदनगर पोलीसांनी ठोकल्या बेड्या..!!
माधवी गिरी गोसावी पुणे जिल्हा प्रतिनिधी
वालचंदनगर पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने दुचाकी वरून येवुन हिसकावून पळून जाणाऱ्या दोन आरोपींना बारामतीत वालचंदनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये रोहित विजय बोरकर (वय 21) रोहित उर्फ कोच्या दीपक कुदळे (वय 20) अशी आरोपींची नावे आहेत. सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मठापल्ली पोलीस हवालदार गुलाबराव पाटील शैलेश स्वामी जगदीश चौधरी विक्रमसिंह जाधव गणेश वानकर रणजीत देवकर अभिजीत कळस्कर सतिष फुलारे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला. वालचंदनगर पोलिसांच्या कामगिरीबद्दल सर्वसामान्य आणि महिला वर्गातून पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे.
