अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
कोरेगांव स्वारगेट बस अचानक बंद.. सोनू तुझा मा8झ्यावर भरोसा नाय का? कसा ठेवू सांग ना..!!
कलावती गवळी सातारा जिल्हा प्रतिनिधी
सातारा विभागातील राज्य परिवहन महामंडळाच्या कोरेगांव आगारांचा कारभार जैसे तेच आहे, या कोरेगांव आगारांमध्ये अनेक आगर प्रमुख होऊन गेले, मात्र कोरेगांव एसटी डेपो कडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. आज दुपारी कोरेगांव आगारांतून १२:४५ वाजता कोरेगांव स्वारगेट ही बस कोरेगांव आगारांतून काही प्रवासी घेवुन नुकतीच बाहेर पडली होती. ही बस चालक आणि महिला वाहक आणि जवळपास वीस प्रवासी बसले होते. कोरेगांव पासून जवळपास एकच किलोमीटर अंतरावर अचानक बस बंद पडली. त्यानंतर कर्तव्यावर असणाऱ्या महिला वाहकांने संबंधित प्रवाशांना दुसऱ्या बसने सातारकडे मार्गस्थ केले होतं. तर ग्रामीण भागातील मुक्काम शनिवार रविवार कायम रद्द असतात… एसटी आगारांतील अधिकाऱ्यांना याबाबत संपर्क साधला असता ते म्हणतात शनिवार रविवार शाळांना सुट्टी असते. त्यामुळे आम्ही लांबरूट बस मार्गस्थ करीत असतो. नक्की विद्यार्थ्यांसाठी बस आहे की प्रवाशांसाठी असाही प्रश्न ग्रामीण भागातील प्रवासी वर्गाकडून उपस्थित होत आहे.यावेळी अनेक प्रवासी वर्गातून कोरेगांव आगारांचा कधी कारभार सुधारणार वेळोवेळी कोरेगांवच्या एसटी बस अचानक बंद पडत आहेत तसेच चालक वाहक आपली ड्युटी आहे म्हणून बस मार्गस्थ करतात बसची तपासणी करून बस ताब्यात घेत नसल्याचेही प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.
