अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
बारामती हादरली, माझ्या जागेत बाथरूम का बांधले, या कारणांवरून पुतण्याचा खून; बाप लेकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!!
माधवी गिरी गोसावी पुणे जिल्हा प्रतिनिधी
बारामती मधून एक धक्कादायक घटना समोर आले आहे. माझ्या जागेत बाथरूम का बांधले, म्हणून विचारायला जाणे एका तरुणाच्या जीवावर घेतला आहे. बाप लेकाने आपल्या पुतण्याला बेदम मारहाण केली यात पुतण्याचा जागीच मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे पुतण्या मारहाण केल्यानंतर हे दोघे बाबल्या पोलीस ठाण्यात येवुन सौरभ विरोधात फिर्याद दिली. ही घटना बारामती तालुक्यांतील पारवाडी येथील इंगळे वस्तीवर बुधवारी रात्री दहाच्या सुमारांस घडली आहे. या घटनेमध्ये सौरभ विष्णू इंगळे ( वय 24) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. बारामती तालुका पोलिसांनी बाप लेकाला अटक केली आहे. माझ्या जागेत तू बाथरूम का बांधले हे विचारणा करण्यासाठी सौरभ विष्णू इंगळे हा गेला होता. त्याने इंगळे वस्तीवर प्रमोद आणि रामचंद्र इंगळे यांना जबाब विचारला याचे भांडणात रूपांतर झाले, या भांडणात प्रमोद आणि रामचंद्र इंगळे या दोघांनी सौरभला बेदम मारहाण केली. या दरम्यान आपल्याला मारहाण होत असल्याची माहितीही सौरभने पोलिसांना दिली होती. बारामतीत दवाखान्यात आणल्यानंतर सौरभची प्रकृती आणखी बिघडली आणि त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. विशेष म्हणजे या दरम्यान प्रमोद इंगळे व रामचंद्र इंगळे हे दोघेजण बारामती तालुका पोलीस ठाण्यात आले होते. आणि त्यांनी सौरभ विरोधात फिर्याद दिली. मात्र पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करीत आहेत मात्र पुढील तपास करीत असून पुढील कारवाई काय काय करणार? यावर सर्वांचं लक्ष लागले आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
