अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शिक्षक दिनानिमित्त सातेगाव येथील भालेरावसर यांना पुरस्कार
श्रीहरी अंभोरे पाटील
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे गेल्या दोन वर्षापासून शिक्षक दिनानिमित्त शिक्षकाना आमदार राजू भैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठानकडून पुरस्कार वितरण केल्या जाते यामध्ये सातेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मोतीरामजी भालेरावसर यांना जिल्हाधिकारी. आमदार यांच्या पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
मोतीरामजी भालेराव सर हे वसमत तालुक्यातील रिधुरा गावचे मूळ रहिवाशी असून वसमत तालुक्यातील सातेगाव या छोट्याशा गावातील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत आहेत त्यांच्या कामाची व शाळेची एकूणच गुणवत्ता पाहता त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
