अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मुस्लिम समाजाच्या विविध समस्या सोडविण्याची अल्प संख्याक आयुक्तांकडे मागणी
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय मागासलेपण दुर करण्यासाठी व समाजाच्या सर्वांगीण विकासा साठी त्यांच्या महत्वपूर्ण समस्या व मागण्यांचे निवेदन अल्प संख्याक आयुक्त श्रीमती प्रतिभा इंगळे छत्रपती संभाजी नगर यांना प्रत्यक्ष भेटुन येथिल सामाजिक कार्यकर्ते शेख महेमुद अमिनोद्दीन यांनी दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांनी मुस्लिम समाजाच्या मागासले पणाचा अभ्यास करण्यासाठी वेळोवेळी गठित केलेले रंगनाथ मिश्रा आयोग, सच्चर समिती, महेमुद-ऊर्र-रहेमान समीती यांच्या अहवालने विविध क्षेत्रात या समाजाचे मागासलेपण सिद्ध झाले आहे.या समाजाचे मागास लेपण दूर करण्यासाठी मुस्लिम समाजाला विशेष मागासवर्ग घोषित करुन सर्वच क्षेत्रांमध्ये १०% आरक्षण देण्यात यावे. २०१४ मध्यमे तत्कालीन शासनाने अध्यादेशाद्वारे घोषित केलेले व मा. उच्च न्यायालयाने शैक्षणिक क्षेत्रात मान्य केलेले ५% आरक्षण कायदा पारित करुन ताबडतोब लागू करावे. राज्यशासनाने घोषित करुन डब्यात ठेवलेले अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था सारथी, आर्टि, बार्टि घ्या धर्तीवर भरघोस निधी देऊन पुर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात यावी. मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियंत्रीकी व इतर व्यावसायिक शिक्षणासाठी शैक्षणिक फी च्या ५०% फी सवलत शिष्यवृत्ती योजना मार्फत देण्यात यावी. मागास वर्गीय सहकारी संस्थांच्या धर्तीवर अल्पसंख्याक सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी कायदा करण्यात यावा. प्रत्येक तालूक्याच्या ठिकाणी ऊर्दु घर व सांस्कृतिक सभागृह उभारण्यात यावे. न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आयोग, सच्चर समिती, महेमुद- ऊर्र-रहेमान समीती यांच्या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अल्पसंख्याक समाजा च्या विकासासाठी सुरु केलेली १५ कलमी योजना पुर्ण क्षमतेने कार्यान्वित करुन त्याची अंमल बजावणी करण्यात यावी.या व अशा आशयाचे मागणी करणारे निवेदन शेख महेमुद यांनी अल्पसंख्याक आयुक्त श्रीमती प्रतिभा इंगळे छत्रपती संभाजी नगर यांच्याशी सवविस्तर चर्चा करून सादर केले.
