अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
संन्यास दीक्षा ग्रहन समारंभ कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी मुकुंद मोरे
कर्जत तालुक्यातील देवपाडा नेरळ येथील वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून नेरळ व नेरळ परिसरात समाज प्रबोधन करणारे , ज्येष्ठ नागरिक म॔डळाचे खजिनदार #हभप शिवरामबुवा नथु तुपे महाराज यांचा भाद्रपद आश्विन – १९४७, रविवार दिनांक – ७ सप्टेंबर २०२५ रोजी सायकांळी – ४.०० वाजता नेरळ जवळील मौजे आर्डे ह्या गावी “संन्यास दिक्षा ग्रहण ” समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. त्यांनी सुखी संसाराच्या बंधनातून पूर्णपणे त्याग करत मानवसेवा व आध्यात्मिक मार्गाचा स्विकार केला आहे. ह्या पवित्र संन्यास दिक्षा सोहळ्यास उपस्थित राहून त्यांना खूप खूप मनापासून मनस्वी शुभेच्छा देण्यात आल्या. ह्यावेळी रायगड जिल्हा परिषेचे माजी सदस्य तथा नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सावळाराम हिराजी जाधव, तत्कालीन कोल्हारे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तानाजी सखाराम जाधव, जिते गावचे सामाजिक कार्यकर्ते व दानशूर व्यक्तिमत्त्व दशरथशेठ वामन जाधव, हभप नरेंद्र दादा पाटील, नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संजय वसंत मनवे, नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य पुंडलिक विठ्ठल भोईर, कोल्हारे गावचे सामाजिक कार्यकर्ते रमेश दामा म्हसकर, आदिवासी समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळू हेमा भगत, मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते अब्दुल मन्नान शेख आदि उपस्थित होते.
