अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मागणी करण्यात आली
जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन पक्षप्रमुख सन्मानीय श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्यापाशी करण्यात आले. जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती, ठाणे व शिवसेना उद्धवजी ठाकरे ठाणे जिल्हा शाखा, त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक आणि पुरोगामी जन संघटना यांच्या वतीने जनसुरक्षा विधेयक रद्द करा ही मागणी करण्यात आली.
याप्रसंगी माझ्यासह शिवसेना उद्धवजी ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख श्री. केदार दिघे, राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे माजी गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर प्रमुख श्री. सुहास देसाई, उद्धवजी ठाकरे पक्षाचे ओवळा- माजिवडा विधानसभेचे संपर्क प्रमुख श्री. नरेश मणेरा, शिवसेना उद्धवजी ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख – शिवसेना प्रवक्ते श्री. अनिष गाढवे, कोपरी पाचपाखाडी विधानसभा, ठाणे शहर विधानसभा व कळवा मुंब्रा दिवा विधानसभा क्षेत्रातील सर्व उपजिल्हाप्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख ,महिला जिल्हा संघटक, शहरप्रमुख, उपशहर प्रमुख, समन्वयक, उप समन्वयक, विभागप्रमुख,उप विभागप्रमुख,शाखाप्रमुख,उप शाखाप्रमुख, युवासेना, युवतीसेना आणि इतर संलग्न संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
