अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
गोपाळकुमार कळसकर यांना दै.कर्णधार वृत्तपत्रातर्फे ‘नॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२५ जाहीर
पुणे प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
भुसावळ : सुप्रसिद्ध राज्य दैनिक कर्णधार वृत्तपत्राच्या तिसऱ्या वर्धापन दिन व शिक्षक दिनानिमित्त आयोजित ‘नॅशनल आयकॉन अवार्ड २०२५’ साठी आयुध निर्माणी वरणगाव येथील गोपाळकुमार चांगदेव कळसकर यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी गोपाळकुमार कळसकर यांना हा अवार्ड प्रदान करण्यात येणार आहे. दैनिक कर्णधार वृत्तपत्राद्वारे सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून शिक्षक दिवस व दैनिक कर्णधार वृत्तपत्र वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी नॅशनल आयकॉन अवार्डचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यामध्ये पत्रकारिता, शिक्षण, साहित्य, सामाजिक, खेळ, राजकीय, सौंदर्य, डॉक्टर , वकील ,महिला, सहकार, पतसंस्था, कला , इत्यादी क्षेत्रात कर्तृत्व घडवणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. यामध्ये दैनिक बाळकडू,अधिकारनामा,अहिल्याराज, महाराष्ट्र ग्रामीण २४, दर्पण, सारथी महाराष्ट्राचा आदि वृत्तपत्रांमधून सामान्य जणांच्या व्यथेला वाचा फोडणारे पत्रकार म्हणून व सामाजिक क्षेत्रात समाजहितवर्धक भूमिका निभावणारे तसेच झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा सचिव गोपाळ कळसकर यांची पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील ‘नॅशनल आयकॉन अवार्ड’ साठी करण्यात आली आहे. ११सप्टेंबर २०२५ रोजी मलकापूर येथील भातृ मंडळ हॉलमध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तिथे मान्यवरांच्या हस्ते गोपाळ कळसकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार निवडीबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
