अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
डोंबिवलीतील ६५ इमारतींचा प्रश्न – हजारो कुटुंबांची उभी राहिलेली लढाई
डोंबिवलीतल्या ६५ इमारतींमध्ये राहणारे रहिवासी हे काही गुन्हेगार नाहीत त्यांनी आपल्या आयुष्यभराची कमाई ओतून घर विकत घेतलं, आज त्या घरावरच कारवाईचा टांगता तलवार लटकतेय.
आज समर्थ कॉम्प्लेक्स वर कारवाई होणार असल्याचं कळताच, तिथले रहिवासी आपली लेकरं, आई-वडील, ज्येष्ठ नागरिकांसह खाली उतरून उभे राहिले. त्यांच्या डोळ्यातलं अश्रू पाहून मन हेलावलं. त्या क्षणी मीही तिथे पोहोचलो आणि रहिवाशांना दिलासा दिला की
शिवसेना उद्धवजी ठाकरे पक्ष तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तुमच्या डोक्यावरचं छप्पर कुणीही हिरावून घेऊ देणार नाही.
यानंतर मंत्रालय, मुंबई येथे मा. प्रधान सचिव/अप्पर मुख्य सचिव इंजि. असीम कुमार गुप्ता साहेब यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक झाली.
त्या बैठकीत आम्ही स्पष्टपणे सांगितले की निर्दोष रहिवाशांवर नाही, तर खरी कारवाई फक्त आणि फक्त दोषी विकासकांवरच व्हावी.
आज हजारो कुटुंबांचा प्रश्न आहे, त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे.
मला विश्वास आहे की शासनाकडून सकारात्मक निर्णय होईल आणि या गोरगरीब जनतेला न्याय मिळेल.
तुमच्या घरावर, तुमच्या हक्कावर कुणी डल्ला मारू देणार नाही, हीच माझी भूमिका
बैठकीस मा. आमदार राजेश मोरे मा. नगरसेवक नितीनजी पाटील, महसूल विभाग व नगरविकास विभागाचे अधिकारी, ६५ इमारत बचाव समितीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते.
डोंबिवली ६५इमारतप्रश्न घरहक्क जनतेचा आवाज गोरगरीबांचान्याय
