अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील, गुन्हेगारांवर कारवाईसाठी प्रयत्नशील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी:-
संभाजी पुरीगोसावी सातारकर..!!
कलावती गवळी सातारा जिल्हा प्रतिनिधी
ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून 22 मे. 2025 रोजी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी बदली दिवशीच पोलीस अधीक्षक म्हणून तत्कालीन पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी देखील सातारकरांच्या मनात एक वेगळाच ठसा निर्माण केला होता. समीर शेख यांनी देखील 22 नोव्हेंबर 2022 पासून सातारा पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले होते. जिल्ह्यात नेहमीच प्रयत्नशील राहिले, त्यांच्या कालावधीमध्ये प्रतापगडावरील अफजल खान कबरींच्या परिसरांतील वादग्रस्त बांधकाम हटविण्यात आली त्याचबरोबर जिल्ह्यातील विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका शांततेत पार पडल्या होत्या. जिल्ह्यात त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, त्यांच्या उत्कृंष्ट कामगिरीमुळे निवडणुकीच्या काळात देखील त्यांची अचानक बदली झाली होती. मात्र काही तासांतच समीर शेख यांना पुन्हा सातारा जिल्ह्यात संधी मिळाली होती. मात्र 22 मे 2025 रोजी त्यांची अखेर मुंबईला बदली झाल्यानंतर नव्याने दाखल झालेले पुणे लोहमार्गाचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी बदली दिवशीच सातारा पोलीस अधीक्षक म्हणून त्यांच्याकडून पदभार स्वीकारला होता. तुषार दोशी यांना देखील महाराष्ट्र पोलीस खात्यात कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी म्हणून चांगलेच ओळखले जाते. दोशी यांनी चंद्रपूर गडचिरोली आणि राजुरा लातूर शहर सोलापूर पुणे जालना अशा विविध जिल्ह्यात विविध पदावर उत्कृंष्ट सेवा दिली. (तुषार दोशी यांची पहिली पोस्टिंग नक्षल प्रभावित जिल्ह्यात) नाशिक मध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर चंद्रपूरमध्ये तुषार दोशी यांची पहिली पोस्टिंग झाली होती. राजुरांचे डीवायएसपी म्हणून देखील नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली आणि राजुरा या नक्षल प्रभावित भागात सेवा बजावली होती. यानंतर लातूर शहर सोलापूर पुणे आणि नवी मुंबई अशी त्यांची कारकीर्द राहिली. पुणे पोलीस दलात सायबर विभागांचे ते पोलीस उपायुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. (अश्विनी बिद्रें प्रकरण हाताळलं) नवी मुंबईत ते पोलीस उपायुक्त असताना घडलेलं अश्विनी बिद्रें या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्येचे प्रकरण देखील तुषार जोशी यांनी कुशलतेनं हाताळले होतं. त्या खटल्यात वरिष्ठ पोलीस अधिकारीच मुख्य आरोपी होता: नुकताच त्या खटल्याचा निकालही लागला असून मुख्य आरोपींनी शिक्षा सुनाविण्यात आली आहे. तसेच एजाज खानच्या अटकेचं प्रकरणही चांगलेच गाजले होतं. तुषार दोशी यांनी याही प्रकरणात अगदी सखोल तपास केला होता. तसेच जालना पोलीस अधीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यानंतर पुणे लोहमार्गाचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. आणि आता सातारा पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहत आहेत. 22 मे. 2025 पासून सातारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील, आहात.
