अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
बारामतीत महिला पोलीस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागांच्या जाळ्यात … पोलीस ठाणेतच वीस हजार स्वीकारले, बारामतीत कारवाई;
कलावती गवळी पुणे जिल्हा प्रतिनिधी
बारामती तालुका पोलीस ठाण्यात 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तालुका पोलीस ठाणेतील महिला पोलिस हवालदार अंजना विभीषण नागरगोजे ( वय 38 ) रा. निर्मिती विहार सोसायटी रुई बारामती) यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागांने केलेल्या या कारवाईमुळे बारामतीत खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका तक्रारदारांने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदार व त्याची पत्नी सासू-सासरे व मेहुणा यांच्या विरोधांत मेव्हण्याच्या पत्नीने बारामती तालुका पोलीस ठाणेत 2 सप्टेंबर 2025 रोजी शारीरिक व मानसिक छळ अशी तक्रार दाखल केली होती. आणि याच गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार अंजना नागरगोजे करीत होत्या. या गुन्ह्यात तक्रारदार व त्याच्या तीन नातेवाईक यांना गेट जामिन देवुन अटक न करण्यासाठी महिला पोलीस हवालदार नागरगोजे यांनी तक्रारदारांकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. अंतिम तडजोडीनंतर तक्रारदार व त्याची पत्नी आणि सासू-सासरे या चौघांकडे प्रत्येकी पाच रुपये प्रमाणे एकूण 20 रुपये द्या अशी मागणी केली होती. परंतु तक्रारदाराला ती मान्य नसल्याने ( दि. 9 सप्टें ) रोजी त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे फोनद्वारे तक्रार दाखल केली होती. याच तक्रारीच्या अनुषंगाने बुधवारी पडताळणी करण्यात आली. नागरगोजे यांनी तक्रारदार व त्याच्या तीन नातेवाईकांना दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये गेट जामिन देवुन अटक न करण्यासाठी 20 हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले, त्यानुसार पोलीस ठाणेतच लाच स्वीकारताना महिला पोलीस हवालदार अंजना नागरगोजे यांना रंगेहाथ पकडण्यात आले, सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुवर्दा सावळे व त्यांच्या पथकांने केल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी दिली आहे.*
