अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी: रविंद्र आढाळे
शहरातील सहा वर्षीय बालकाची जाळून हत्या करण्यात आली होती. या संदर्भात आरोपीला आठ दिवस पोलीस कोठडी मिळाल्याने आता आरोपी पोपटासारखा बोलू लागला लागला असून या खुनाच्या गुन्ह्यात इतर कलमांसह आता बाललैंगिक अत्याचाराचे कलम पोस्को कलमाची वाढ करण्यात आली आहे.
यावल शहरात घडलेल्या या संतापजनक घटनेचा पोलीस कसून तपास करीत असून आणखी पुढे यात काही आरोपी वाढतात का याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून आहे. दि.5 सप्टेंबर रोजी बाबुजीपुरा भागातील सहा वर्षीय मुलगा बेपत्ता झाला होता. ईद ए मिलादच्या सण आणि या सणावर मुलगा बेपत्ता झाल्यामुळे पूर्ण परिवारासह वाड्यात विरजण पडले होते. दि.6 सप्टेंबर रोजी बालकाचा मृतदेह शेजारी राहणाऱ्याच्या संशयीत आरोपी शेख शाहिद शेख बिस्मिल्ला याच्या घरात जळालेल्या अवस्थेत मिळून आला. या संदर्भात मयताचे आजोबांनी संशयित आरोपी विरूद्ध फिर्याद दिल्याने शेख शाहिद शेख बिस्मिल्ला (वय 22) या संशयिता विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल कण्यात आला त्यानुसार यावल पोलिसांनी पुढील कारवाई केली. आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मसलोद्दीन शेख हे करीत आहेत. अनैसर्गिक संबंधातून सदरचा खून झाल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
