अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये प्रेसिडेंशियल टेस्ट कॅप सेरेमनी; अव्वल विद्यार्थ्यांना ऑरेंज व यलो कॅपने सन्मानित.
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : दि. १० सप्टेंबर रोजी श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रेसिडेंशियल टेस्ट यशस्वीपणे घेण्यात आली. इंग्रजी,विज्ञान आणि गणित या विषयांमध्ये इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन प्रत्येक वर्गातील अव्वल दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या परंपरेनुसार प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यां ना ऑरेंज कॅप, तर द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना यलो कॅप देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक स्पर्धा आणि उत्कृष्टतेची भावना वाढवण्यात आली.शाळेच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमा त डॉ. भाले, डॉ. सानप, डॉ. खलसे, खजिने मॅडम, नारायण चट्टे सर, तेलभरे सर, डॉ.नाईक नवरे, डॉ.सोनटक्के,रवी डासाल कर, श्रीहरी अबुज सर, बैनवाड सर, चव्हाण सर, पुंडकरे सर, पांडुरंग काकडे सर, सोनवणे सर आणि सालुंखे सर यांसह शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.ऑरेंज कॅप (प्रथम क्रमांक) मिळविणारे विद्यार्थी इयत्ता १: कुणाल इंगळे इयत्ता २: ह्रिदान जोगदंड, अर्णेश नाईकनवरे ,इयत्ता ३: आद्या खजिने, आद्या सोनटक्के,इयत्ता ४: प्रांजळ सनाप, आरव कोळे इयत्ता ५: आराध्या सावंत,इयत्ता ६: प्रज्वल रोडगे, प्रेर्णा काश्टे
इयत्ता ७: शिवम फाटे, गौरी अबुज,इयत्ता ८: तेजश्री चौधरी, समर्थ मगर ,इयत्ता ९: सोनाली सोनवणे, सान्वी मारेवार,इयत्ता १०: क्षितिजा खजिने, तनिक्षा तेलभरे. यलो कॅप (द्वितीय क्रमांक) मिळविणारे विद्यार्थी इयत्ता १: चैतन्य खलसे,इयत्ता २: सान्वी चव्हाण, ओजस्वी चौरे
इयत्ता ३: माधवी सालुंखे, रीद्धी डासालकर, इयत्ता ४: मंजिरी खलसे, प्रियल बैनवड,इयत्ता ५: समृद्धी सुरवसे,इयत्ता ६: आशिष झोडगे, उन्नती राठी,इयत्ता ७: ईश्वरी काजळे, सर्वज्ञ भाले, इयत्ता ८: सृष्टी कदम, रुतुराज चट्टे,इयत्ता ९: कृष्णा काकडे, तनिष्का पुंडकरे ,इयत्ता १०: संस्कार व्हनराव, कनाद पवार श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी सांगितले, “प्रेसिडेंशियल टेस्ट ही शाळेची वार्षिक परंपरा असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक उत्कृष्टतेची स्पर्धा वाढते. हे विद्यार्थी शाळेचा अभिमान आहेत आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.” या कार्यक्रमाने शाळेच्या शैक्षणिक वातावरणाला चालना मिळाली. सचिव डॉ सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, मुख्याध्यापक श्री. कार्तिक रत्नाला,प्रगती क्षीरसागर आणि इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या अव्वल विद्यार्थ्यांना शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये प्राधान्य देण्यात येईल.
