अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलिस मित्र समिती महाराष्ट्र राज्य वतीने
२८ सप्टेंबर माहिती अधिकार दिन : जनजागृतीसाठी गडचिरोलीतून सरकारकडे ठाम मागणी
गडचिरोली, प्रतिनिधी अप्रव भैसारे
२८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी हा दिवस साजरा करावा, यासाठी माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र समिती तर्फे मा. राज्यपाल, मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना ई-मेलद्वारे निवेदन व स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे. समितीने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, माहिती अधिकार अधिनियम २००५ हा पारदर्शक व जबाबदार प्रशासन घडवून आणणारा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. याबाबत शासन निर्णय क्रमांक – *केमाअ २००८/पत्र क्र. ३०८/०८/सहा* व *३७८/०८/सहा* दिनांक २० सप्टेंबर २००८ अन्वये जिल्हाधिकारी यांना दरवर्षी माहिती अधिकार दिन साजरा करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
यंदा २८ सप्टेंबर २०२५ हा दिवस रविवारवर येत असल्याने शासन आदेशानुसार माहिती अधिकार दिन २९ किंवा ३० सप्टेंबर २०२५ रोजी साजरा करावा अशी स्पष्ट मागणी समितीने केली आहे.
समितीच्या प्रमुख मागण्या :
१. जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना तातडीने आदेश निर्गमित करावेत.
२. माहिती अधिकारविषयक जनजागृतीसाठी कार्यशाळा, शपथविधी, प्रदर्शन व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
समितीचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोज उराडे यांनी स्पष्ट केले की, “माहिती अधिकार हा लोकशाहीचा प्राण आहे. नागरिकांना त्यांच्या हक्कांची खरी जाणीव व्हावी यासाठी हा दिवस प्रत्येक जिल्ह्यात सक्रीयतेने साजरा होणे अत्यावश्यक आहे.”
