अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
२५ देशी झाडं लागवड व संगोपन कार्याचा शुभारंभ
हिंगोली .श्रीहरी अंभोरे पाटील
हिंगोली येथील वैजनाथ अप्पा सराफ नागरी सहकारी बँक आणि सदभाव सेवाभावी संस्थेचा वतीने उपक्रम राबविण्यात आला आहे
हिंगोली येथील श्री संत नामदेव कवायत मैदान, तिरुपती नगर आणि महावीर नगरात या ठिकाणी देशी झाडे एकुण 7 ते 8 फुटाची उंची असले ऐकुन 25 देशी झाडं लावण्यात आले आहे आणि त्या ठिकाणी लागवड करण्यात आलेल्या झाडांना जगविण्यात येणारं आहे. याचा शुभारंभ वैजनाथ अप्पा मराठवाडा नागरी सहकारी बँक लिमिटेड हिंगोलीचे माजी चेअरमन तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुरेशअप्पा सराफ यांच्या हस्ते पिंपळाचे आणि बदामचे झाडं लागवड करून करण्यात आला आहे
सदभाव सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने वड, पिंपळ, बदाम, बहावा, कडुलिंब, कदंब, बकुळ आदि विविध देशी जैवविविधता राखणारी झाडं लावण्यात येणार आहेत. निसर्गाचे पर्यावरण संतुलित राखण्यासाठी व मानवी जीवनाला पशुपक्ष्यांना विसावा व सर्व प्राण्यांना ऑक्सिजन मिळावा यासाठी हे पाऊल उचलनं आवश्यक असल्याने हा कार्यक्रम घेण्यात बोलण्यात आले होते त्यानुसार त्या वटवृक्षांची लागवड ही करण्यात आली.
यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष शर्मा,रेणुकादास वैद्य,रवींद्र येवले, विलास गोटरे, प्रदीप जोशी,किरण जोशी, गजानन नपते, नरेश पालीमकर, योगेश शर्मा,अजय शर्मा,अमरजीत महाजन,शरद जाधव तसेच
सदभावचे डॉ. अभयकुमार भरतीया, विनोद खरात, पी एस आय शैलेश मुदिराज, साईनाथ अनमोड, जमादार संजय मारके,ऍड. सुभाष वाघमारे, मुजाहीद पठाण, सतीश लदनिया, अर्जुन यादव यांची उपस्थिती होते
