अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
ऑपरेशन सिंदुर चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव-रोख पारितोषिकांसह सन्मान
प्रतिनिधी सतीश कडू
७ सप्टेंबर रोजी भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते गणेश गाडेकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
या सोहळ्यात प्रथम पारितोषिक कु.निकीता नक्षुलवार हिला रु. ७,०००/- रोख, द्वितीय पारितोषिक कु. यशिका लांजेवार हिला रु. ५,०००/- रोख, तर तृतीय पारितोषिक कु. रुचिका किशोर मोटघरे हिला रु. ३,०००/- रोख तसेच सन्मानपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. याशिवाय उत्कृष्ट चित्र या श्रेणीत निवड झालेल्या ३० कलाकारांना विशेष बक्षिसे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून परमेश्वरराव राऊत, शरद वानखेडे, कुणाल पडोळे व प्रदीप सोमनकर उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक व प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंशुल कामडी, यश डाफ, जाॅर्ज धावडे, तन्मय बावनकर, शुभम भगत, महेश दडमल व भारत पिसे यांनी अथक प्रयत्न घेतले.
