अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
नांदेड सिटीत भव्य मेगा हेल्थ चेक अप कॅम्पचे यशस्वी आयोजन
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी संजय धर्मे पुणे
नांदेड सिटी येथील गणेशोत्सवात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिनांक ३१/०८/२५ रविवार सकाळी १० ते १ वाजेपर्यंत अम्फिथिएटर (गणेश मंडप ) येथे भव्य निशुल्क संपूर्ण आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात जनरल हेल्थ, स्त्रीरोग, बालरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, ऑर्थोपेडिक तज्ज्ञ , फिजिओथेरपी , डायबिटीस , प्रकृती चिकित्सा , होमिओपॅथी, आयुर्वेद, दंतचिकित्सा, आहार व पोषण व्यवस्थापन, त्वचारोग, कान नाक व घसा तज्ञ अशा डॉक्टरांकडून मोफत सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले . सोबतच काही पॅथॉलॉजिकल टेस्ट व तपासण्या सहयोग पॅथॉलॉजी लॅब आणि स्टार पॅथॉलॉजी लॅब तर्फे निशुल्क करण्यात आल्या. शिबिराचे उद्घाटन सत्राचे सूत्रबद्ध संचलन रामराज्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. शिरीष पाटील यांनी केले. दीप प्रज्वलन मान्यवरांचे हस्ते झाले. रेसिडेन्शियल डॉक्टर्स असोसिएशन ऑफ नांदेड सिटीचे अध्यक्ष डॉ. अनिल दूधभाते यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी विशेष अतिथी श्री समीर जाधवराव, श्री सुधीर काळकर, ब्रह्माकुमारी श्रीमती ललिता दीदी, नांदेड सिटीचे संचालक श्री.सुजित कारले यांनी शिबीर आयोजनाबद्दल गौरवोद्गार काढले.
नांदेड सिटी सेवा कार्यात अग्रेसर जुने जाणते कार्यकर्ते स्व. सतीश कुलकर्णींच्या पावन स्मृतीस सदर शिबीर समर्पित करण्यात आले . या शिबिरात एकंदर ३० डॉक्टरांनी आपला सहभाग नोंदविला . *शिबीर सुरू असताना रुग्णांच्या विविध प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांनी उत्तरे दिली या प्रश्नोत्तराच्या सत्राचे संचालन डॉ. ऋषिकेश दामले आणि डॉ. वैशाली गोमसाळे यांनी केले.*
जवळपास २७५ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला . *सदर शिबिराचे आयोजन रामराज्य ज्येष्ठ नागरिक संघ आणि रेसिडेन्शिअल डॉक्टर असोसिएशन ऑफ नांदेड सिटी* यांनी संयुक्तपणे केले होते. सदर शिबिराला *मराठवाडा मित्र परिवार आणि श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय* पुणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिराचे यशस्वीतेसाठी डॉ. विकास क्षीरसागर, डॉ.हरीश गोरे , डॉ.वैशाली गोसावी, डॉ.मीनाक्षी रोंघे, श्री. रविजी कल्याणी, श्री परमानंद पोतदार, श्री शिवाजीराव खेसे, सौ वंदना सोमठाणकर, सौ. ललिता कुलकर्णी , श्री दिगंबर बोपर्डीकर, श्री.गिरीश वसेकर, श्री प्रमोद कुलकर्णी, श्री शेषराव गायकवाड, श्री अभिराम रोंगे , डॉ.गायकवाड, डॉ. प्रियांका निंबाळकर, श्री सतीश खानझोडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
याप्रसंगी सांस्कृतिक समितीचे श्री.राम बेंद्रे व सौ.शीतल करे उपस्थित होते. शिबिराबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले . दरवर्षी असेच शिबिर नित्यनेमाने व्हावे , अशी अपेक्षा नांदेड सिटी येथील रहिवाशी व्यक्त करीत होते. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी संजय धर्मे पुणे
