अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
राज्यातील सरकारी वनजमिनी बळकवनाऱ्यावर होणार SIT चौकशी सिडको जमीन घोटाळा उघड होणार
प्रतिनिधी सोमनाथ काळे
राज्यातील सरकारी वनजमिनी बळकवल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने SIT स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे सिडको जमीन घोटाळ्यात महत्वपूर्ण पाऊल आहे, याप्रकरणी पाठपुरावा करणारे स्थानिक भूमिपुत्र तसेच कॉन्शियस सिटीझन फोरम यांसारख्या सामाजिक संघटनांचे हे यश असून सर्वांचे अभिनंदन!
आम्ही सादर केलेले तब्बल १२ हजार पानांचे पुरावे, सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीने राज्याच्या मुख्य सचिवांना चौकशी करण्याबाबतचं लिहिलेलं पत्र आणि आता राज्य सरकारने SIT स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय अशाप्रकारे चोहोबाजूने मजबूत सापळा लागत आहे. परंतु मागील काळात वेगवेगळ्या प्रकरणात स्थापन झालेल्या SIT चा इतिहास बघता केवळ वेळ मारून नेण्याचे प्रकार झाले आहेत. मात्र या प्रकरणात भ्रष्टाचारी मंत्र्याला कितीही संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही कोणत्याही भ्रष्ट माशाला या प्रकरणातून सुटू देणार नाही .
आरोपी नंबर 2 बिवलकर महाराष्ट्रातच असून लवकरच देश सोडणार असल्याची माहिती आहे, त्यामुळे बिवलकर देशाबाहेर पळून जाण्यापूर्वी लुकआउट नोटीस देऊन अटक करणे गरजेचं आहे. आम्ही एवढी स्पष्ट माहिती देऊनही उद्या बिवलकर देशाबाहेर गेल्यास राज्याचे मुख्यमंत्री त्यासाठी पूर्णपणे जबाबदार असतील .
उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी राज्याला ओरबाडून खाणाऱ्या या भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घेऊन भ्रष्टाचारी मंत्र्यांची गय केली जाणार नाही हे मुख्यमंत्री दाखवून देतील का? की अशा भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालून पुन्हा राज्याला लुटायला मोकळं सोडतील ? मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची महाराष्ट्र वाट बघत आहे. असो, काहीही झालं तरी हा विषय आपण मार्गी लावणारच, त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांनी आणि कुळधारकांनी कुठलीही काळजी करू नये.
