सातारा कारीतील त्या गर्भवती ऋतुजाचा बळी… सासरच्या लोकांना हवा होता मुलगा च.. अवघा कारी परिसर अघाप सुन्नच..!!
संगिता इंनकर सातारा जिल्हा प्रतिनिधी
पुरोगामी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या साताऱ्यातील कारी येथील घटना कलंकित करणारी ठरली.वंशाला दिवा म्हणून मुलगाच पाहिजे या हव्यासापोटी पोटात बाळ असलेल्या ऋतुजा मोरे या निष्पाप विवाहितेचा बळी गेला आहे. तिच्याबरोबर तीन वर्षाच्या चिमुकल्या स्पृहालाही जग कळण्याआधींच जावे लागेल. या घटनेने भेदरलेला कारी परिसर गेले तीन दिवसांपासुन अजुन ही सुन्न च आहे. येते का लगेच परळी खोऱ्यातील कारी येथे मन फिरवणारी घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. गर्भवती मातेने आपल्या दोन मुलींसह विहिरीत उडी घेवुन आत्महत्या केली होती. मात्र या घटनेत मातीसह एका मुलीचा दुर्दैवी अंत झाला आहे. विहिरीतील एका फांदीला पकडून ठेवल्याने एका चिमुरडीचा जीव वाचवता आला. या घटनेत गर्भातील बाळ दगावले. ऋतुजा विशाल मोरे (वय 27) स्पृहा विशाल मोरे (वय 3) या मायलेकींचा मृत्यू झाला.तर त्रिशा विशाल मोरे (वय 6) ही चिमुरडी या घटनेत बचावली आहे. ऋतुजाच्या आईने मोठ्या आनंदाने जवळच कारी गावात तिचे लग्न लावून दिले होते. दरे गांव आणि कारी हे अंतरही जास्त नाही. अगदी दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर आपली मुलगी आपल्या नजरेत राहील, अशी भाबडी अआशा बिचाऱ्या आईंची होती. ऋतुजाची सासू ही तिच्या माहेरच्या दरे, (आरे दरे ) गावाचीच म्हणजे सोयरे सुतकही अगदी जवळच, परंतु लग्नानंतर सासरकडच्या अपेक्षा वाढतील किंवा इतक्या खालच्या थरास जातील अशी अपेक्षाही या कुटुंबाकडूंन नव्हती. या घटनेने दरेगांव आणि कारी परिसरांतून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
