अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
त्रेता युग फाॅंडेशन अयोध्या तर्फे शेख महेमुद यांना राष्ट्रीय विर रतन सन्मान.
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : माध्यमिक शिक्षक पदि राजीव गांधी हायस्कुल ताडबोरगांव ता. मानवत येथे कार्यरत व सेलू येथील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते शेख महेमुद यांच्या सामाजिक कार्य व वर्तमान परिस्थिति वरील निर्भिड व सटिक फेसबुक पोस्टची दखल घेऊन उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या येथील त्रेता युग फाॅंडेशन तर्फे भारतीय स्वतंत्रता दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय विर रतन पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरणासाठी उपस्थित राहता न आल्याने सदरील पुरस्कार पोस्टाद्वारे पाठविण्यात आला. या पुर्वि हि शेख महेमुद यांना वेगवेगळ्या संस्थांद्वारे जिवन गौरव, मराठवाडा भुषण, महाराष्ट्र रतन, आदर्श शिक्षक, सर्वश्रेष्ठ समाजसेवक, बेस्ट स्टोरी रायटर सह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्रेतायुग फाॅंडेशन अयोध्या तर्फे शेख महेमुद यांना राष्ट्रीय विर रतन पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
