अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पत्रकार विशाल बाळु अडागळे यांना युवा ग्रामीण पत्रकार संघ पुणे जिल्हाध्यक्षपदी पदोन्नती
पुणे जिल्हा उपसंपादक गणेश राऊत
युवा ग्रामीण पत्रकार संघामध्ये पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदावरून पुणे जिल्हा अध्यक्षपदी विशाल बाळु अडागळे यांची एकमताने बिनविरोध पदोन्नती.
युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री गणेश कचकलवार, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री गणेश महाडिक, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष मा. श्री संतोष लांडे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष मा. श्री कांतभाऊ राठोड, पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष मा. श्री गोपाळ भालेराव, पुणे जिल्हा महिला सचिव सौ अनघलक्ष्मी दुर्गा यांच्या वतीने एकमताने बिनविरोध मा. श्री विशाल बाळु अडागळे यांची पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदावरून पुणे जिल्हा अध्यक्षपदी पदोन्नती करण्यात आली. युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पुणे जिल्हा अध्यक्षपदी पदोन्नती झाल्याने श्री. विशाल बाळु अडागळे यांचे खुप खुप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा देण्यात आल्या.
संपूर्ण भारतभर कार्यक्षेत्र असलेले युवा ग्रामीण पत्रकार संघ हे अतिशय उत्कृष्ट कार्य करत असून जनहितार्थ सदैव प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळते.
