अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
लेखक भूषण सरदार आयोजित आवाज लेखणीचा काव्य संमेलन 21 सप्टेंबर ला नाशिक येथे
वास्तव आणि दुसरं प्रेम कविता संग्रह प्रकाशित
प्रतिनिधी – सारंग महाजन
बी एस एफ बहुद्देशीय संस्था अमरावती व उपेक्षित नायक न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ओझर, नाशिक येथील पुस्तकांचं हॉटेल या ठिकाणी आवाज लेखणीचा हे राज्यस्तरीय काव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. भूषण सरदार हे बी एस एफ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून उपेक्षित नायक न्यूज पेपर चे मुख्य संपादक आहेत. ते दिग्दर्शक व निर्माता असून विषय व विदर्भाचा शेतकरी या मराठी युट्युब फिल्म त्यांनी स्वतः दिग्दर्शीत केल्या आहेत. त्यांचा वास्तव हा मराठी काव्य संग्रह आणि दुसरं प्रेम काव्य संग्रह प्रकाशित आहे. तसेचं तिसरा काव्य संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. आवाज लेखणीचा या काव्य संमेलनात जवळपास 40 कवी सहभागी असून पत्रकार, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्यांना सत्यशोधक पत्रकार पुरस्कार व जनहित गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमासंबंधि अधिक माहिती हवी असल्यास कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भूषण सरदार 9420621994 वर सपंर्क करावा अशी माहिती पत्रकारांशी बोलतांना त्यांनी दिली.
