अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शिंदवणे प्रतिनिधी अमोल महाडिक
शिंदवणे दि. ८- हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे क्रीडा विभाग प्रमुख भाऊसाहेब महाडिक यांना यावर्षीचा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार सोहळा रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय खेड या ठिकाणी संपन्न झाला असून खेड तालुका माध्यमिक व मुख्याध्यापक शिक्षकेत्तर संघाने आयोजन केले होते. पुरस्कार सोहळ्यासाठी अध्यक्षपद पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी भूषवले, खेडचे आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय नायकडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टे, भगवान पोखरकर, तनुजाताई घनवट, डाएट पुण्याचे प्राचार्य पी. शेंडकर, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव नंदकुमार सागर, तसेच अमोल पवार, अरुण चांभारे, विजय शिंदे, अंकुश राक्षे, सुरेश शिंदे, अनिल राक्षे, सुधीर मुंगसे यांच्यासह जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्ष उत्तम पोटवडे, सचिव रामदास रेटवडे विश्वस्त मधुकर नाईक कार्याध्यक्ष संजय बोरकर, बाळासाहेब वायकर विलास आदलीग, दत्तात्रय येवले अरविंदर गवळे, योगेश माळशिस्कार, संतोष काळे, सुनिल कड, सुर्यकांत मुंगसे, भोलेनाथ कड, लतीफ शेख शिंदवणे विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष संभाजी महाडिक महात्मा गांधी विद्यालयाचे उपप्रचार्य गोविंदराव जाधव, संजय टिमगिरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावना सचिव रामदास रेटवडे यांनी केले. सुत्रसंचालन प्रवीण काळे तर उत्तम पोटवडे यांनी आभार मानले भाऊसाहेब महाडिक यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल उत्पन्न तेबाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, पुणे जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप ढमाले,माजी कृषी पर्यवेक्षक संजय टिळेकर, ग्रामपंचायत माजी सदस्य शरद खेडेकर कोरेगाव मूळ सोसायटीचे अध्यक्ष अमित सावंत, रामलाल तांबे, भाऊसाहेब कांचन यांनी कौतुक केले.
