अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
उरण मधील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना मा आमदार मनोहरशेठ भोईर यांनी भेटी देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले
प्रतिनिधी मुकूंद मोरे रायगड जिल्हा
मनोहरशेठ भोईर हे गोरगरीबांच्या समस्या सोडवून त्यांना प्रतिसाद मिळवून देतात आणि गोरगरीब जनतेच्या मतदीला धावून जात असतात उरण मध्ये विकास कामांचा बाबतीत खूप योगदान आहे.
उरण मतदार संघातील मा आमदार व शिवसेना उद्धवजी ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख श्री मनोहरशेठ भोईर यांनी उरण व द्रोनागिरी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले, यामध्ये उरण बाजारपेठेतील शिवसेना उरण सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, राजे शिवाजी मित्र मंडळ, बुरुड आळी व राजे शिवाजी युवक मित्र, कामठा तसेच भुपाली गृह संकुल, द्रोणागिरी यांचा समावेश आहे, या वेळी आयोजकांनी त्यांचे पुष्पगुच्छ व शाल अर्पण करून स्वागत केले.
सदर वेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख श्री नरेश रहाळकर, मा नगराध्यक्ष श्री गणेश शिंदे, उरण शहर संपर्कप्रमुख श्री गणेश म्हात्रे, नागाव सरपंच श्री सी के गायकवाड, नवघर शाखाप्रमुख अविनाश म्हात्रे, श्री गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी संदेश पाटील, चेतन म्हात्रे, संतोष भुवड, राजू धुमाळ व कार्यकर्ते उपस्थित होते.
