अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शासकीय कार्यालयात २८ सप्टेंबर २०२५ हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा
विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे ईमेल द्वारे दिलेल्या निवेदनात केली मागणी
हेमकांत गायकवाड ,जळगांव जिल्हाध्यक्ष,स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना महाराष्ट्र राज्य आणि ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेना
प्रतिनिधी समाधान पाटील
नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम तसेच जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना तसेच ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष हेमकांत गायकवाड यांनी ई-मेल द्वारे निवेदनात आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय कार्यालयात २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्याची केली मागणी
माहिती अधिकार हा कायदा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे.तसेच या कायद्याचे महत्व व उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिक यांना व्हावी म्हणून शासकीय आस्थापना म्हणून आपली जबाबदारी आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो.हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने २८ सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्र शासन अधिनस्त प्रत्येक सरकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा असा शासन निर्णय क्रमांक – केमाअ २००८/पत्र क्र.३७८/०८/ सहा सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई दिनांक २० सप्टेंबर २००८ शासन निर्णय संदर्भानुसार आहे.
सदर निर्णयानुसार दर वर्षी शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे आदेश आहे.या निर्णयानुसार माहिती अधिकार या विषयावर विविध उपक्रम साजरे करून तसेच प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी देऊन नागरिकांना या माहिती अधिकार दिन उपक्रमात सहभागी करून घ्यावे व त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी
१)माहिती अधिकार विषय व्याख्यानमाला/चर्चासत्र २)प्रश्नमंजुषा,निबंध,वकृत्व,इ.स्पर्धा ३)माहिती अधिकार अधिनियमावर आधारित प्रदर्शन
४)स्थानिक नागरिक सामाजिक संस्था व शालेय महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सहभाग,घ्यावा
असे शासनाने सुचविलेले आहे.त्याची आपल्या शासकीय कार्यालयात अंमलबजावणी व्हावी.या वर्षी २८ सप्टेंबर २०२५ या ‘दिवशी रविवार तसेच २७ सप्टेंबर शनिवार असल्यामुळे सुट्टी आहे.त्यामुळे २८ सप्टेंबर २०२५ रोजी शक्य नसल्यास सदर माहिती अधिकार दिन हा २६ सप्टेंबर २०२५ किंवा २९ सप्टेंबर २०२५ या दिवशी साजरा करावा तशा सूचना आपल्या अधिनस्त सर्व कार्यालयांना तातडीने कराव्यात ही आपणास विनंती तसेच माहिती अधिकार कायद्या बाबत अधिकारी व कर्मचारी नागरिकांमध्ये जनजागृती करून आणण्यासाठी वरील उपक्रम राबविण्यात यावेत अशी मागणी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे हेमकांत गायकवाड,पत्रकार (जळगांव जिल्हाध्यक्ष) स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना महाराष्ट्र राज्य आणि ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेना यांनी ईमेल द्वारे दिलेल्या निवेदनात केली आहे
