अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
माॅ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कॅसल मील येथील पुतळ्याला शिवसेना नेते माजी खासदार श्री राजनजी विचारे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
स्व.माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कॅसल मील येथील माँ साहेब मीनाताई ठाकरे चौकात माँ साहेबांच्या अर्धपुतळ्याला शिवसेना नेते, माजी खासदार श्री राजनजी विचारे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शिवसेना उपनेते, मा. आमदार, मा.महापौर स्व. अनंत तरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याची सुरुवात झाली होती.
या सोहळ्याला ठाणे उप जिल्हाप्रमुख श्री. प्रदीप शिंदे, उप शहरप्रमुख श्री.सचिन चव्हाण, शहर समन्वयक श्री.संजय तरे, जिल्हा महिला उप जिल्हाप्रमुख महेश्वरी तरे, महिला विभाग संघटक वैशाली मोरे, माजी नगरसेविका विद्या कदम, विभागप्रमुख श्री.मयूर पैलकर, महिला उप विभागप्रमुख राजश्री सुर्वे आणि कविता नार्वेकर, युवा सेना शाखा अधिकारी श्री. सागर माने, युवा सेना विभाग संघटक श्री. विशाल जयसिंगपुरे, महिला उप विभाग संघटक अनुराधा चव्हाण, महिला उप शाखाप्रमुख स्मिता सपकाळ आणि कल्पना कदम, नामदेव जगदाळे, उप शाखाप्रमुख निलेश कदम, संत इत्यादी पदाधिकारी उपस्थितीत होते
