अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे ह्यांच्या
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अर्धांगिनी, शिवसेना आणि तमाम शिवसैनिकांची आधारस्तंभ, सर्वांची ‘मातोश्री’ मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
प्रतिनिधी मुकुंद मोरे
बाळासाहेबांच्या प्रत्येक निर्णयामागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या, शिवसेनेच्या प्रत्येक संकटात मायेची ढाल बनून आधार देणाऱ्या आणि प्रत्येक शिवसैनिकाला आपल्या मुलांप्रमाणे मायेने जवळ करणाऱ्या मासाहेब. त्यांनी मातोश्री नावाचा अर्थ केवळ घरापुरता मर्यादित न ठेवता, तो लाखो शिवसैनिकांच्या हृदयात रुजवला.
त्यांच्यामुळेच, पक्ष म्हणजे फक्त एक संघटना नाही, तर एक कुटुंब बनले. त्यांची शिकवण, त्यांचा त्याग आणि कार्यकर्त्यांबद्दलची त्यांची निस्सीम आपुलकी आमच्यासाठी कायमच प्रेरणास्थान राहील.
आज त्यांच्या स्मृतिदिनी, मासाहेबांनी रुजवलेलं प्रेम, त्याग आणि निष्ठा आम्ही सदैव जपणार आहोत. तुमची आठवण कायम मनात राईल
स्मृतिदिनानिमित्त पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे आणि सौ. रश्मीवहिनी ठाकरे ह्यांनी छत्रपती शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर अभिवादन केले. शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते सचिव खासदार
