अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
आझादनगर, कोथरूड येथे हारवलेली मुलगी अखेर सापडली आहे.
संपादक संतोष लांडे
शिवशाही प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या तात्परतेमुळे आझादनगर येथे हरवलेली मुलगी सापडली असून तिची विचारपूस करून तिच्या घरचा शोध लावला व तिला तिच्या आई – वडिलांच्या स्वाधीन सुखरूप पाठविण्यात आले. यावेळी कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मा. संदिप देशमाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी कोथरूड पथकाचे श्रुती वैभव कढणे, त्यांची सहकारी जाधव यांनी ओळख पटवून पुढील तपास करून आई वडिलांना त्यांची हरवलेली मुलगी स्वाधीन केली. यावेळी अमोल काळे, हिमांशु इंगोले, मयुर भालिया, सार्थक मोकाटे, चेतन पवार, निहाल शेख, सोहेल शेख उपस्थित होते.
• राज गोविंद जाधव
अध्यक्ष युवक कॉंग्रेस कोथरूड विधानसभा
संस्थापक शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य
