अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सांगली जिल्ह्यात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी : जिल्ह्यात १० गुन्हे दाखल – प्रभारी अधिकारी रूपाली बोबडे..!!
कलावती गवळी सांगली जिल्हा प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी जिल्ह्यात 10 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सायबर पोलीस ठाणेच्या नूतन प्रभारी अधिकारी रूपाली बोबडे यांनी दिली आहे. जिल्ह्यात मॉनेटरिंग सेल मार्फत सोशल मीडियावरील 82 आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर विविध पोलीस ठाणेत 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर सायबर पोलीस ठाणेचा 24 तास वॉच राहणार असून यापुढेही अशाच कारवाया सुरू राहणार असल्याची माहिती सायबर पोलीस ठाणेच्या नूतन प्रभारी अधिकारी रूपाली बोबडे यांनी दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली सायबर पोलीस ठाणे हे सोशल मीडिया मॉनेटरिंग सेल स्थापना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सांगली सायबर पोलीस ठाणेतील अधिकारी व अंमलदार यांनी सोशल मीडिया मॉनेटरिंग सेल मार्फत 24 तास सोशल मीडियावरील वेगवेगळ्या आक्षेपार्ह पोस्ट शोधून पोस्ट करणाऱ्यांवर जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाणे मार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणेच्या प्रभारी अधिकारी रुपाली बोबडे सतीश आलदर करण परदेशी विवेक साळुंखे अजय पाटील अभिजीत पाटील विजय पाटणकर इम्रान महालकरी यांच्या पथकांने ही कारवाई केली आहे.
